केळीच्या उत्पादनवाढीसाठी… | पुढारी

केळीच्या उत्पादनवाढीसाठी...

केळी पिकाच्या उत्पादनवाढीसाठी बागेचे उष्ण आणि सोसाट्याच्या वार्‍यापासून संरक्षण होण्यासाठी पश्‍चिम आणि दक्षिण बाजूस शेवरी, गजराज गवत, गिरीपुष्प यांचे दाट सजीव कुंपण करावे. केळीची हिरवी पाने न कापता फक्‍त पिवळी, जुनी झालेली, वाळलेली तसेच रोगग्रस्त पाने कापून बाग स्वच्छ ठेवावी. पहिले 5 ते 6 महिने खते द्यावीत. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होऊन फळधारणा चांगली होते. केळीच्या दोन ओळींमध्ये किंवा दोन ओळींच्या पट्ट्यांमध्ये हिरवळीच्या खतांची पिके (उदा. ताग, चवळी, धेंचा इत्यादी) घेऊन ती फुले येण्याच्या अगोदरच कापून जमिनीत गाडावीत. झाडाच्या बुंध्याजवळ येणारी पिले नियमित कापावीत. त्यामुळे अन्‍नद्रव्य आणि पाण्याचा गैरवापर टाळता येतो. केळी पिकास पाणी देताना बागेत फार खोल वाफे बांधून आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.

Back to top button