

कमी कालावधीत तयार होणारे खरीप हंगामातील 'राजमा' हे महत्त्वाचे पीक आहे. मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला योग्य असते. खरीप हंगामातील 21 अंश ते 25 अंश से. तापमान आणि उबदार दमट हवा या पिकाला चांगली मानवते.
पूर्वीचे पीक निघाल्यानंतर उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. नंतर मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर कुळवणी अथवा ट्रॅक्टरने हॅरो मारून घ्यावा. त्यामुळे ढेकळे फुटून काडीकचरा व्यवस्थित वेचून घ्यावा. नंतर कुळवाच्या एक-दोन पाळ्या घ्याव्यात म्हणजे जमीन भुसभुशीत होईल.
मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच जूनच्या दुसर्या पंधरवड्यात राजमाची पेरणी करावी. पेरणी जास्तीत जास्त 5 जुलैच्या पूर्वी करावी. त्यानंतर पेरणी केल्यास हे पीक चांगले वाढत नाही. या पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने प्रती हेक्टरी 120 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. दोन ओळीत 30 से.मी. आणि दोन रोपात 15 से.मी. असे पेरणीचे अंतर असावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम + 2 गॅ्रम कार्बेन्डेझीम चोळून बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम राझझोबियम जीवाणूसंवर्धक 10 ते 15 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. पेरणी करताना 30 किलो नत्र आणि 80 किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा द्यावी. म्हणजेच 170 किलो डीएपी प्रती हेक्टरीप्रमाणे खत द्यावे. यानंतर पीक 20 दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता 30 किलो म्हणजेच 70 किलो युरिया प्रती हेक्टरी द्यावा.
पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी. हे पीक 65 ते 70 दिवसांत तयार होते. 'राजमा' पिकाची कापणी करून झोडून मळणी करावी. नंतर धान्य 5-6 दिवस उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट आणि ओलसर जागेत करू नये.
सुधारित जाती
– जगदीश काळे