हवामान : बदलतं पाऊसमान

हवामान : बदलतं पाऊसमान

हवामान : चंद्र भूषण

हवामानाचा अंदाज घेण्याची आपली वैज्ञानिक क्षमता वाढत आहे; पण दुसरीकडे हवामानाची पद्धतही खूप वेगाने बदलत आहे. आज हवामान बदलामुळे आपली नैसर्गिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचा इतर सजीवांवर आणि शेतीवर खूप परिणाम होत आहे. सध्याचे वातावरण आणि पावसाचे रौद्ररूप पाहिले तर त्याच्या अनैसर्गिकपणाची प्रचिती येते.

सध्या संपूर्ण उत्तर भारतामध्ये अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही वर्षांतील स्थिती पाहिल्यास पावसाळ्यात अतिमुसळधार पाऊस पडणे हे आता नित्याचे झाले आहे. पूर्वीदेखील असाच पाऊस पडायचा. मात्र सध्याचे वातावरण आणि पावसाचे रौद्र रूप पाहिले तर त्याच्या अनैसर्गिकपणाची प्रचिती येते. यंदाच्या वर्षीचा विचार करता यावेळी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्यात इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे की, यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आगमनास उशीर, नंतर खंड आणि उत्तरार्धाकडे वाटचाल करताना अतिपाऊस अशी मान्सूनच्या वितरणाची अलीकडील काळातील स्थिती बनली आहे. यावरून हवामानात व्यापक बदल झाल्याचे स्पष्टपणाने दिसून येत आहे. वस्तुतः गेल्या काही वर्षांत पावसाने अनैसर्गिक बनण्याचे संकेत दिलेले होते; आता ते प्रत्यक्षात अनुभवास येत आहेत.

भारतीय हवामान खात्याने यंदा देशात उशिरा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र त्यापेक्षा मान्सूनने अधिक काळ विलंब केला. जून महिन्यात पहिल्या 20 दिवसांमध्ये मान्सूनमध्ये मोठी तूट होती. देशाच्या काही भागात विशेषतः पश्चिम आणि दक्षिण भारतात ही तूट 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. पण आश्चर्यकारकरीत्या गेल्या आठ-दहा दिवसांत पाऊस सरप्लस झाला आहे. साधारणतः 600 ते 650 मिलिमीटर पाऊस झाला तर आयएमडीकडून त्याला 'साधारण' असे संबोधले जाते. साधारण पावसाचा अर्थ केवळ पावसाचे प्रमाण असे नाही. पाऊस कधी आला, कोणत्या हवामानात आला, कोणत्या हंगामात हवा होता आणि तो आला की नाही, याचाही विचार केला जातो. त्याद़ृष्टीने विचार करता देशात आज सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे; मात्र प्रचंड पाऊस पडूनही आणि पूर येऊनही त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळत नाहीये. शेतीसाठी आपल्याला मॉडरेट मान्सूनची गरज भासते. आयएमडीच्या मते, मान्सून सरप्लस आहे की साधारण हे पाहताना त्याच्या गुणवत्तेवरही चर्चा होणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या काळात ही गुणवत्ता बाधित झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानाचा अंदाज सांगण्याबाबत आपल्या शास्त्रज्ञांनी अचूकतेच्या द़ृष्टीने चांगली प्रगती केली आहे. मात्र एकंदरीत हवामानाचा स्वभाव झपाट्याने बदलत चालला आहे. यावर्षी फेब्रुवारीत उष्णतेची लाट आली होती; पण राजधानी दिल्लीत मात्र यंदा उष्म्याचे प्रमाण कमी होते. यामागचे कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ. पृथ्वीचे तापमान, ज्याला पृष्ठभागाचे तापमान असे म्हणतात, ते पूर्व-औद्योगिक युगाच्या म्हणजेच 1850 च्या तुलनेत सुमारे दीड (1.5) अंशाने वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ याला रेलिंग मानतात. त्याचे उल्लंघन केले तर आपण अज्ञात जगात प्रवेश करू. म्हणजे त्या स्थितीत हवामान नेमके कसे असेल हे सांगता येणार नाही. आज हवामान बदलामुळे आपली नैसर्गिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचा इतर सजीवांवर आणि शेतीवर खूप परिणाम होत आहे.

यंदाच्या मान्सूनवर 'अल निनो'चा प्रभाव राहणार, ही बाबही हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केली होती. परंतु अल निनो सक्रिय झाल्यामुळे प्रत्येक वर्षी दुष्काळच पडेल असे नाही. ही बाब सर्वांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण इतिहास पाहिला तर, आपल्या देशाने बहुतेकदा अल निनोमुळे आलेला दुष्काळ अनुभवलाही आहे. 1979 सालचा अल निनो इतका विनाशकारी होता की, त्यावर्षीच्या दुष्काळाने भारतीय अर्थव्यवस्था 5 टक्क्यांहून अधिक संकुचित झाली. पण त्याच वेळी काही अल निनो वर्षांमध्ये मोठे पूरही आलेले आहेत. अल निनोचा परिणाम जुलै आणि ऑगस्टमध्ये अधिक प्रकर्षाने पाहावयास मिळेल. विशेष म्हणजे रब्बी हंगामावर आणि पुढील वर्षीच्या खरीप हंगामावर त्याचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे. यावर्षी 'अल निनो'मुळे पावसात असमतोलपणा राहू शकतो. कारण यावर्षी ऊन देखील अधिक होते. अल निनोमुळे डिसेंबरमध्ये तापमानात वाढ दिसू शकते आणि जानेवारी, फेब्रुवारीत उष्णतेची लाट येऊ शकते. 2023 चा हिवाळा नेहमीपेक्षा जास्त उबदार राहिल्यास गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. उच्च तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा गव्हाला बसलेला फटका अलीकडील काळात अनेकदा पाहिला आहे. 2022 मध्ये, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विक्रमी तापमानामुळे गव्हाचे उत्पादन जवळपास 5 दशलक्ष टनांनी कमी झाले. 2023-24 मध्ये तापमान आणखी वाढले तर गव्हाच्या उत्पादनावर होणारे परिणाम आणखी मोठे होऊ शकतात. याव्यतिरिक्त उच्च तापमानामुळे वीज पुरवठा आणि आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधांवरही दबाव येऊ शकतो.

तात्पर्य, 'अल निनो'चा प्रभाव केवळ पाऊस कमी होणे या रूपातूनच दिसत नाही. अल निनोचेही काही पॅटर्न आहेत. दरवर्षी अल निनो अधिक सक्रिय राहात नाही. यापूर्वी आलेला अल निनो अधिक सक्रिय होता; त्यापूर्वीचे अल निनो तुलनेने कमजोर होते. त्यामुळे अल निनोच्या पावसावरील परिणामांबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

येत्या काळाचा विचार करता, आपण ग्लोबल वार्मिंगची एक अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडली आहे. त्याचे परिणाम पाहता येणार्‍या भविष्यकाळात दीड अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. हा एक आपल्यासाठी इशारा आहे. सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशातील काही थरारक व्हिडीओ
सर्वांनी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news