बुरशी आणि जीवाणूंद्वारे पिकांवरील कीड नियंत्रण कसे करावे?

बुरशी आणि जीवाणूंद्वारे पिकांवरील कीड नियंत्रण कसे करावे?
Published on
Updated on

परोपजीवी कीटकावर जगणारा दुसरा परोपजीवी कीटकास 'परपराश्रयी कीटक' असे म्हणतात. तसेच एका यजमान कीटकाच्या प्रजातीवर एकापेक्षा अधिक परोपजीवी कीटकाच्या प्रजाती आश्रित असल्यास त्यास बहुपरोजीवी कीटक असे म्हणतात. एकच कीटक एकाच यजमान कीटकावर जीवन जगतो त्यास एक भक्षी परोपजीवी कीटक असे म्हणतात.

विविध किडी, बुरशी, जीवाणू आणि सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. हे नुकसान थांबविण्यासाठी रासायनिक औषधे वापरता येतात, परंतु रासायनिक औषधांचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे मानवाच्या आरोग्याला आणि एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका थांबविण्याला जैविक कीड नियंत्रण हा उत्तम पर्याय आहे. निसर्गात उपलब्ध असलेले परोपजीवी, परभक्षी कीटक आणि जैविक रोगजंतू इत्यादींचा वापर करून कीड नियंत्रण करणे म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय.

परोपजीवी कीटक : हे कीटक यजमान कीटकापेक्षा लहान असतात आणि ते एकाच अवस्थेमध्ये परोपजीवी असतात. हे कीटक यजमान कीटकांच्या शरीरावर अथवा शरीरात राहून त्यांना हळूहळू खातात. या कीटकांचा जीवनक्रम पूर्ण करण्यास एकच यजमान कीटक पुरेसा होतो. उदा : बोंड अळीच्या अंड्यावरील आंतर परोपजीवी ट्रायकोग्रामा. परोपजीवी कीटकांचे काही प्रकार असतात. जे कीटक खर्‍या अर्थाने जगण्यासाठी दुसर्‍या कीटकांवर अवलंबून राहतात, त्यास परोपजीवी कीटक असे म्हणतात. एक परोपजीवी कीटकावर जगणारा दुसरा परोपजीवी कीटकास परपराश्रयी कीटक असे म्हणतात. तसेच एका यजमान कीटकाच्या प्रजातीवर एकापेक्षा अधिक परोपजीवी कीटकाच्या प्रजाती आश्रित असल्यास त्यास बहुपरोजीवी कीटक असे म्हणतात. एकच कीटक एकाच यजमान कीटकावर जीवन जगतो त्यास एक भक्षी परोपजीवी कीटक असे म्हणतात. याशिवाय अनेक भक्षी परोपजीवी कीटक अनेक यजमान कीटकांवर जीवन जगतो.

परभक्षी कीटक : हे कीटक भक्षक कीटकापेक्षा मोठे असतात आणि ते एकापेक्षा अधिक अवस्थांमध्ये परोपजीवी असू शकतात. हे कीटक भक्षक कीटकास पूर्णपणे खातात आणि त्यामुळे भक्षक कीटक त्वरित मरतो. एक परभक्षी कीटक अनेक भक्षक कीटकांना खातो. उदा. मावा खाणारा लेडीबर्ड बिटल.

बुरशी आणि जीवाणूंद्वारे कीड नियंत्रण

रोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या बुरशीचा आणि वाढ संवर्धक जीवाणूंचा वापर करून पिकावरील वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस फ्ल्युरोसन्स इत्यादीचा वापर केला जातो.

– विलास कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news