

Tata Harrier EV
टाटा मोटर्सने त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा हॅरियर ईव्ही भारतात लाँच केली आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत २१.४९ लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. याचे बुकिंग २ जुलै २०२५ रोजी सुरू होईल. या लाँचसह हॅरियर ईव्ही आता टाटाची सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक कार बनली आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांच्या माहितीनुसार, Harrier.ev ही हाय-परफॉर्मन्स, फिचर लोडेड इलेक्ट्रिक SUV असून ती ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाइन केलेली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्हीची acti.evplus पूर्णतः EV आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे.
ही टाटाची अशी पहिली कार आहे जी AWD म्हणजेच ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमने सुसज्ज आहे. यामुळे ती केवळ ६.३ सेकंदात ० ते १०० किमी ताशी वेग घेते. याआधी 4X4 हे फीचर सफारी, हेक्सा आणि आरिया सारख्या टाटा मॉडल्सलमध्ये होते.
Harrier EV मध्ये दोन बॅटरी पॅक आणि दोन मोटर सेटअपचा पर्याय उपलब्ध आहेत. त्यात लो व्हेरिएंटमध्ये 65 kWh बॅटरी तर हाय व्हेरिएंटसमध्ये 75 kWh बॅटरी देण्यात आली आहे.
Tata Harrier.ev ही गाडी सिंगल चार्जवर ६२७ किमी पर्यंतच्या रेंजसाठी MIDC सर्टिफाईड आहे. यामुळे ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य अशी आहे. १२० किलोवॅट डीसी फास्ट चार्जर वापरून २५ मिनिटांत २० टक्के ते ८० टक्के चार्जिंगसह केवळ १५ मिनिटांत २५० किमी रेंजचे जलद चार्जिंग करता येते. घरी चार्जिंग असलेल्या ऑपशन्समध्ये ७.२ kW आणि ३.३ kW एसी सोल्यूशन्सचा समावेश आहेत.
डिझाइनच्या बाबतीत पाहिल्यास, हॅरियर ईव्हीचा बाहेरचा भाग त्याच्या डिझेल व्हर्जनसारखाच आहे. पण त्यात काही खास ईव्ही फिचर्स जोडली आहेत. सर्वात पहिले म्हणजे, फ्रंटला बंद ग्रिल दिले आहे. बंपरला हलके असे रिडिझाईन केले गेले आहे. यामुळे बॅटरी आणि मोटरसारख्या वस्तू थंड राहण्यास मदत होते.
कंपनीने हॅरियर ईव्हीमध्ये मूळ मॉडेलचे बोल्ड आणि मस्क्युलर स्टायलिंग कायम ठेवले आहे. त्यात डिझेल व्हर्जनसारखेच डे-टाइम-रनिंग लाइट्स (DRL) आणि हेडलॅम्प दिले आहेत.
डिझाइनध्ये एरो इन्सर्टसह R19 अलॉय व्हील्स, LED बाय-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, सिक्वेन्सियल टर्न सिग्नल्स आणि हॅरियर लोगो प्रोजेक्शनसह ORVM यांचा समावेश केला आहे. Harrier.ev नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट अशा चार रंगांत उपलब्ध आहे. तसेच त्यात बोल्ड आणि आकर्षक लूकसाठी डॉक इंटरेरियरसह मॅटी ब्लॅक स्टील्थ एडिशनदेखील आहे.