Suzuki e-Sky इलेक्ट्रिक कार लाँच; रेंज, किंमत आणि फीचर्स पाहा

सुझुकीने बाजारपेठेत आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार 'Suzuki e Sky' अधिकृतपणे लाँच केली आहे.
Suzuki e Sky
Suzuki e SkyFile Photo
Published on: 
Updated on: 

Suzuki e Sky

नवी दिल्ली: सुझुकीने बाजारपेठेत आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार 'Suzuki e Sky' अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने सर्वप्रथम जपानमध्ये ही कार सादर केली असून, यापूर्वी ही कार 'व्हिजन ई स्काय' या संकल्पनेवर आधारित म्हणून प्रदर्शित करण्यात आली होती. आकर्षक डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्ससह ही कार एका चार्जमध्ये तब्बल ३१० किलोमीटर धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

Suzuki e-Sky ही इलेक्ट्रिक कार आकाराने अत्यंत सुटसुटीत आहे. या कारची लांबी ४ मीटरपेक्षा कमी असल्याने ज्यामुळे रहदारीच्या ठिकाणी आणि अरुंद रस्त्यांवर चालवण्यासाठी ती अत्यंत सोयीची ठरेल. सुझुकीने या कारला 'बॉक्सी' डिझाइन दिले आहे. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, रूफ स्पॉयलर, पार्किंग सेन्सर्स, १०.१-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सुरक्षिततेसाठी ADAS, ३६0 डिग्री कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

Suzuki e Sky
Buying a new car? डिझेल-पेट्रोल, CNG, EV की हायब्रिड? तुमच्या ड्रायव्हिंग गरजेनुसार कोणती कार योग्य?

रेंज किती?

कंपनीने अद्याप या कारच्या बॅटरीची क्षमता, मोटर आणि चार्जिंग स्पीड अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. मात्र, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ३१0 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल, असे सांगण्यात आले आहे.

किंमत किती?

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, जपानमध्ये ही कार १.५५ मिलियन जापानी येन मध्ये लाँच करण्यात आली आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे ९.५० लाख रुपये होते. येत्या १६ नोव्हेंबरपासून जपानमध्ये या कारची विक्री सुरू होणार आहे.

भारतात कधी होणार लाँच?

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार सध्या केवळ जपानी बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार लाँच केली जाईल की नाही, याबद्दल निर्मात्याने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Suzuki e Sky
Lanzante car logo : या 30 कोटींच्या लक्झरी कारचा लोगो आहे आपले ‘गणपती बाप्पा’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news