Lanzante car logo : या 30 कोटींच्या लक्झरी कारचा लोगो आहे आपले ‘गणपती बाप्पा’

Namdev Gharal

तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल पण ब्रिटनमधील एक लक्झरी कार कंपनी 'लॅन्झांटे' (Lanzante Limited) या सुपरकार ब्रँडच्या लोगोवर चक्क श्री गणेशाचे प्रतीक आहे. या गणपती बाप्पाच्या लोगोविषयी जाणून घेऊ?

लॅन्झांटे कोणत्याही कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत नाही; तर ग्राहकांच्या आवडीनुसार केवळ मोजक्याच (५ ते १० युनिट्स किंवा कधीकधी फक्त १ युनिट) अत्यंत पॉवरफुल हायपरकार्स तयार करते.

भारतात या सुपरकार्सवर १००% पेक्षा जास्त आयाज शुल्क लावले जाते त्‍यामुळे याची किंमत जाते. £१.५ दशलक्ष ते £३ दशलक्ष पाउंड ची कार (सुमारे १५ कोटी ते ३२ कोटी रुपये) भारतात 30 कोटीच्या पुढे जाते

१९७० च्या दशकात पॉल लॅन्झांटे (Paul Lanzante) यांनी या कंपनीची स्थापना केली. पॉल यांचे जगप्रसिद्ध ब्रिटिश म्युझिक बँड 'द बीटल्स' (The Beatles) चे मुख्य गिटार वादक जॉर्ज हॅरिसन (George Harrison) यांच्याशी खूप घट्ट मैत्रीचे संबंध होते.

जॉर्ज हॅरिसन हे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माने प्रचंड प्रभावित होते. त्यांनीच पॉल लॅन्झांटे यांना आपल्या कंपनीच्या Logo साठी गणपतीची निवड करण्याचा सल्ला दिला होता.

'विघ्नहर्ता' आणि यशाचे प्रतीक: लॅन्झांटे कंपनीने मोटरस्पोर्ट्स आणि रेसिंगच्या क्षेत्रात पदार्पण करताना विघ्नहर्ता, बुद्धी आणि नव्या सुरुवातीची देवता म्हणून श्री गणपतीचे हे रूप आपल्या अधिकृत लोगोमध्ये स्वीकारले.

सुरुवातीला ही कंपनी क्लासिक आणि जुन्या ऐतिहासिक रेस कार्सचे रीस्टोरेशन (दुरुस्ती व नूतनीकरण) करण्याचे काम करत असे.

१९९५ नंतर ही कंपनी ट्रॅकवर धावणाऱ्या अत्यंत वेगवान रेसिंग कार्सना (उदा. McLaren P1 GTR, Porsche 911) तयार करु लागली यातून यांच्या कारचा जन्म झाला

लॅन्झांटेचा भारतात कोणताही अधिकृत शोरूम नाही. जगातील अब्जाधीश आणि अत्यंत मोजक्या सुपरकार कलेक्टर्सनाच ही कार थेट यूकेमधून कस्टमाइज करून मिळवावी लागते.