पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्रा अँड महिंद्राने स्वातंत्र्य दिनी नवीन ५ डोअरचे (5-door) आयकॉनिक ऑफ-रोड SUV मॉडेल थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) लाँच केले आहे. 4x2 MX च्या पेट्रोल व्हेरिएंट्सची किंमत १२.९९ लाख आणि डिझेल व्हेरिएंट्सची किंमत १३.९९ लाख रुपयांपासून (सर्व किंमती, एक्स-शोरूम) सुरू होते. महिंद्राने लाँच केलेल्या थार रॉक्सला थार ५ डोअर असेही म्हटले जाते. यात अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कोची येथे एका हाय-ऑक्टेन रॉक कॉन्सर्टमध्ये थार ROXX चे अनावरण केले.
थार रॉक्समध्ये दोन मजबूत इंजिनांचा पर्याय
दोन्ही इंजिन एका सिक्स-स्पीड मॅन्युअल अथवा सिक्स-स्पीड ॲटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध.
सी-आकाराचे एलईडी डीआरएल.
प्रोजेक्टर हेडलॅम्प, वर्तुळाकार फॉग लाइट्सची सुविधा.
कारच्या आतमध्ये नवीन १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी.
नवीन महिंद्रा थार रॉक्स लक्झरी, परफॉर्मन्स आणि कटिंग एज टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालणाऱ्या सर्व-नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यात जागतिक दर्जाचे एनएचव्ही (नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस) आणि रिफाइंड राइड गुणवत्ता पाहायला मिळते. नवीन महिंद्र थारमध्ये ३ डोअर मॉडेलच्या तुलनेत अतिशय खास फिचर्ससह शक्तिशाली इंजिन असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे.
पॉवरट्रेन ऑप्शनच्या बाबतीत, थार रॉक्समध्ये २.० लिटर, चार-सिलेंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे; जे 160bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय त्यात २.२-लिटर, चार-सिलेंडर, mHawk डिझेल इंजिनदेखील उपलब्ध आहे; जे 150bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. चालकाला सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसमधून पर्याय निवडता येते.
2024 Mahindra Thar Roxx ला बाहेरून एक नवीन ग्रिल आहे. तसेच C-आकाराचे LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प, वर्तुळाकार फॉग लाइट्स, ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि रियर-डोअर-माउंटेड हँडल आहेत. मागील बाजूस, याला आयताकृती एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट-माउंटेड स्पेअर व्हील पाहायला मिळतात.
नवीन Thar Roxx मध्ये आत पाऊल ठेवल्यावर तुम्हाला नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ॲपल कारप्ले आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, संपूर्ण डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री यांसारख्या अनेक फिचर्स त्यात दिसून येतील.
थार रॉक्सची स्पर्धा आता हुंडाई क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टोस, होंडा एलिव्हेट, एमजी एस्टोर, मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडर यांच्याशी असेल.