Harley-Davidson Sportster S
Harley-Davidson Sportster S

हार्ले-डेविडसनच्या “या” जबरदस्त बाइकने केला विक्रम; असा विक्रम करणारी पहिलीच बाईक

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

24 तासांच्या एंड्यूरेंस चाचणीत 3,141 किमी अंतर पार करण्याचा विक्रम करणारी Harley-Davidson Sportster S ही देशातील पहिली मोटरसायकल ठरली आहे. हार्ले डेव्हिडसनच्या स्पोर्टस्टर एसने हीरोच्या ग्लोबल सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) येथे जागतिक दर्जाच्या चाचणी ट्रॅकवर ही कामगिरी केली. यासाठी, राष्ट्रीय रेसर अनुश्रिया गुलाटी आणि विजय सिंग यांचा समावेश असलेल्या पाच रायडर्सच्या गटाने व्लॉगर शुभब्रत मारमार आणि हिरो मोटोकॉर्पच्या वतीने मालो ले मेसन आणि विजय थॉमस हे सामील झाले.

सीआयटी राजस्थानमधील जयपूर येथे आहे. हार्ले डेव्हिडसनच्या स्पोर्टस्टर एसची सीआयटीमध्ये हिरोच्या टीमच्या दोन प्रमुख सदस्यांच्या देखरेखीखाली 24 तास चाचणी घेण्यात आली. दोन सदस्यांमध्ये चेसिस फंक्शनल डेव्हलपमेंट आणि नॅशनल रेसिंग प्रोग्रामचे प्रमुख डेव्हिड लोपेझ कॉर्डोबा आणि वाहन पडताळणीचे प्रमुख अॅलेक्स बस्केट्स यांचा समावेश होता. डेव्हिड आणि अॅलेक्स या दोघांनाही जगभरातील एंड्यूरेंस रेसिंगचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जो या कामगिरी महत्वाचा ठरला.

..असा केला विक्रम

हा कार्यक्रम शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाला, ज्यामध्ये टीमने 31 पिट स्टॉपमधून जावे लागले. यामध्ये इंधन भरणे, रायडर बदलणे आणि प्रत्येक 1000 किमी नंतर नवीन टायर बदलणे समाविष्ट आहे. प्रत्येक राइडरने प्रत्येक रनवर 100 किमीच्या सरासरीने सहा धावा पूर्ण केल्या, जे टाकीमध्ये भरलेल्या इंधनाच्या अंदाजे समान होते. ही कामगिरी करण्यासाठी संघाला 24 तासांत सरासरी 130.9 किमी प्रतितास वेग गाठावा लागला. 1.74 किमी लांबीचा अंडाकृती हाय-स्पीड ट्रॅक माणूस आणि मोटरसायकल या दोघांच्या सहनशक्तीच्या मर्यादांची चाचणी घेण्यासाठी निवडण्यात आला होता.

याविषयी बोलताना हीरो मोटोकॉर्प में हार्ले-डेविडसन बिजनेस यूनिट चचे प्रमुख रवी अवलूर म्हणाले, "आम्ही नुकतेच हार्ले-डेविडसन पॅन अमेरिकाला जगातील सर्वात उंच आणि कच्च्या रस्त्यावर नेले होते. त्यातूनच आम्हाला काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली. नव्या हार्ले-डेव्हिडसन स्पोर्ट्सटर एस, सीआयटी आणि हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीमधील टीमने हा अत्यंत आव्हानात्मक प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केली. ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली, हा या एचडी मोटरसायकलच्या गुणवत्तेचा पुरावा आहे.

पॉवर आणि परफॉरमन्स

हार्ले-डेव्हिडसन स्पोर्ट्सटर एसमध्ये 121 hp रिव्होल्यूशन मॅक्स 1250T V-ट्विन इंजिन आहे. ज्यामुळे चालकाला उत्तम टॉर्क मिळते. हार्ले-डेव्हिडसन लिक्विड-कूल्ड व्ही-ट्विन इंजिनची ही नवीन आवृत्ती कमी आरपीएमवर जबरदस्त टॉर्क निर्माण करण्यासाठी बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये टॉर्क वक्र आहे जो पॉवरबँडद्वारे सपाट राहतो. इंजिनच्या कार्यक्षमतेला सुरूवातीपासून ते मध्यम रेंजपर्यंत मजबूत गती देण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.

लूक आणि स्टाइल

स्पोर्टस्टर एस मॉडेलचे प्रत्येक व्हिज्युअल डिझाइन या बाईक अधिक स्टाईलिश बनवते. यामुळे बाईक शक्तिशाली दिसते. हेतूपूर्ण वापरलेले टेक्सचर, रंग आणि फिनिशमुळे कस्टम शो बाइकचे स्वरूप मिळाले आहे. इंधन टाकी आणि टेल विभाग मोटरसायकलचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून इंजिनला फ्रेम करतो, तर मोठा पुढचा टायर क्लासिक बॉबरच्या फेंडर-लेस फ्रंट एंडची आठवण करून देतो. तसेच, रायडर्स स्पोर्टस्टर एस मॉडेल अॅक्सेसरीज आणि विविड ब्लॅक, स्टोन वॉश व्हाइट पर्ल, मिडनाईट क्रिमसन यांसारख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान

आकर्षक लुक्ससोबतच स्पोर्टस्टर एस मॉडेल ही चालकाला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात तीन प्री-प्रोग्राम केलेले, ड्रायव्हिंग मोड आहेत. स्पोर्ट, रोड आणि रेन हे मोड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मोटरसायकलची कार्यक्षमता नियंत्रणात ठेवतात. आवडीनुसार किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार कार्य करण्यासाठी दोन कस्टम मोड देण्यात आले आहेत. चालकाच्या सुरक्षेव्यतिरिक्त, हार्ले डेव्हिडसनने प्रतिकुल परिस्थितीत किंवा प्रतिकूल रस्त्यांवर चालकाला चांगला अनुभव देण्यासाठी अनेक तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. ज्यामुळे सरळ रेषेत किंवा वळणाच्या वेळी एक्सिलेरेशन, डिएक्सिलेरेशन आणि ब्रेकिंग दरम्यान मोटरसायकल चालकाच्या नियंत्रणात राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news