Driving Licence Online : घरबसल्या काही मिनिटांत मिळवा लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया

काही मिनिटांत तुम्ही ऑनलाईन टेस्ट पूर्ण करून लर्निंग लायसन्स मिळवू शकता
Driving Licence Online
Driving Licence OnlinePudhari Photo
Published on
Updated on

ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हा भारतात कोणत्याही वाहनचालकासाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे. लर्निंग लायसन्स नसताना वाहन चालवणे म्हणजे सरळसरळ वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे वारंवार दंड (चालान) भरावा लागू शकतो. अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन टेस्ट देण्याच्या प्रक्रियेतील अडचणी आणि लांबलचक रांगांमुळे अनेकजण लर्निंग लायसन्स काढणे टाळतात. पण आता ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.

आता RTO मध्ये रांगेत उभारून नाही, घरबसल्या द्या टेस्ट

पूर्वी लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO कार्यालयात जाऊन, रांगेत तासंतास थांबून टेस्ट द्यावी लागत असे. पण आता हीच टेस्ट आपण घरबसल्या ऑनलाईन देऊ शकतो. सरकारच्या परिवहन सेवा (Parivahan Sewa) पोर्टलमुळे हे शक्य झाले आहे. फक्त काही मिनिटांत तुम्ही ऑनलाइन टेस्ट पूर्ण करून लर्निंग लायसन्स मिळवू शकता.

ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी अर्ज कसा कराल?

  • Parivahan Sewa या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • ‘Apply for Learner Licence’ किंवा ‘Online Test/Appointment’ पर्यायावर क्लिक करा.

  • आपले राज्य निवडा.

  • ‘Sarthi Parivahan’ पोर्टलवर तुम्हाला विविध पर्याय दिसतील – त्यात ‘Apply for Learner Licence’ निवडा.

  • अर्ज भरताना आधार कार्ड, पत्ता पुरावा, पासपोर्ट साईज फोटो अशा कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • सर्व स्टेप्स फॉलो करून अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोंदवून ठेवा.

ऑनलाईन टेस्ट कशी द्याल?

पुन्हा सारथी पोर्टलवर जा आणि 'Online LL Test (STALL)' या पर्यायावर क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा.

आता तुम्ही थेट ऑनलाइन टेस्ट देऊ शकता.

महत्त्वाचे

टेस्ट देण्यापूर्वी ‘Tutorial for LL Test’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण मार्गदर्शक व्हिडीओ पाहू शकता. हे पाहिल्यावरच टेस्ट सुरू करता येईल. ही ऑनलाइन टेस्ट सेवा सध्या काही राज्यांपुरती मर्यादित आहे. तुमच्या राज्यात सेवा उपलब्ध नसेल, तर फक्त ऑनलाइन अर्ज करून RTO मध्ये टेस्टसाठी स्लॉट बुक करावा लागेल. त्यामुळे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता RTO मध्ये तासंतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. फक्त काही मिनिटांत, घरबसल्या ऑनलाईन टेस्ट देऊन तुम्ही अधिकृत लायसन्स मिळवू शकता. वेळ, श्रम आणि अनावश्यक त्रास वाचवणारी ही सुविधा नक्की वापरून पाहा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news