Audi Q7 Bold Edition : भारतात ‘ऑडी क्‍यू7 बोल्‍ड’ एडिशन लाँच, जाणून घ्या आलीशान कारची किंमत

Audi Q7 Bold Edition : भारतात ‘ऑडी क्‍यू7 बोल्‍ड’ एडिशन लाँच, जाणून घ्या आलीशान कारची किंमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Audi Q7 Bold Edition | ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज (दि.21) ऑडी क्‍यू7 बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली. ऑडी क्‍यू7 बोल्‍ड एडिशनचे आकर्षक ब्‍लॅक डिझाइन आहे. यामुळे  गाडी आकर्षक आणि आत्‍याधुनिक दिसते. बोल्‍ड एडिशनमध्‍ये ग्‍लॉस ब्‍लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज, ब्‍लॅक विंडो सराऊंड्स, ब्‍लॅक ओआरव्‍हीएम आणि ब्‍लॅक रूफ रेल्‍स आहेत. या आलीशान कारची किंमत 97,84,000 इतकी आहे. 'ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशन' ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेईल. मर्यादित युनिट्स उपलब्‍ध असण्‍यासह ऑडी क्‍यू7 बोल्‍ड एडिशन ग्‍लेशियर व्‍हाइट, मिथोज ब्‍लॅक, नवारा ब्‍ल्‍यू आणि समुराई ग्रे या चार एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

यावेळी ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्हणाले, "ऑडी क्‍यू7 ही ऑडी क्‍यू समूहामधील आयकॉन कार राहिली आहे. यामध्‍ये उल्‍लेखनीय ड्रायव्हिंग गतीशीलतेसह अविश्‍वसनीय वैविध्‍यतेचे उत्तम संयोजन आहे. या बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना विशिष्‍ट स्‍टायलिंग घटकांनी युक्‍त अधिक आकर्षक व्‍हेरिएण्‍ट प्रदान करत आहोत जेथे ही कार रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ऑडी क्‍यू7 स्‍पेशल एडिशन शक्तिशाली इंजिन,आरामदायीपणा, आकर्षकता व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे '

बोल्‍ड एडिशनची वैशिष्‍ट्ये : ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज ऑडीमध्‍ये आकर्षक सुधारणांची भर करते. हे पॅकेज ग्रिलवरील हाय-ग्‍लॉस ब्‍लॅक फिनिश, ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज (फ्रण्‍ट व रिअर), विंडो सराऊंड्स, एक्‍स्‍टीरिअर मिरर्स (ओआरव्‍हीएम) आणि रूफ रेल्‍ससह आकर्षक लुक देते.

ऑडी क्‍यू7 ची इतर ठळक वैशिष्‍ट्ये :

3.0 लीटर व्‍ही 6 टीएफएसआय इंजिनच्‍या शक्‍तीसह 48 व्‍होल्‍ट माइल्‍ड-हायब्रिड सिस्‍टम आणि लीजेण्‍डरी क्‍वॉट्रो ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह या कारमध्ये 340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्कची निर्मिती करण्याची क्षमता आहे. या गाडीचा सर्वोच्च वेग हा ताशी 250 किमी इतका आहे.आणि फक्‍त 5.6 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते.

गाडीमध्ये 48.26 सेमी (आर19) 5-आर्म स्‍टार-स्‍टाइल डिझाइन अलॉइ व्‍हील्‍स आहेत. यासह गाडीमध्ये मॅट्रिक्‍स एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह सिग्‍नेचर डेटाइम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी टेल लॅम्‍प्‍ससह डायनॅमिक टर्न इंडीकेटर्स आहेत. या कारमध्ये सात ड्राइव्‍ह मोड्स दिले आहेत. यामध्ये ऑटो, कम्‍फर्ट, डायनॅमिक, एफिशिएन्‍सी, ऑफ-रोड, ऑल-रोड आणि इंडिव्हिज्‍युअल असे मोड आहेत.

पॅनोरॅमिक सनरूफ, ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस, ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस, जेन्‍यूएन क्रिकेट लेदर अपहोल्‍स्‍टरी, पार्क असिस्‍ट प्‍लससह 3600 कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग, क्रूझ कंट्रोलसह स्‍पीड लिमिटर, 4 झोन एअर कंडिशनिंगसह एअर आयनोझर व अॅरामेटायझेशन, 7 सीटरसह तिसऱ्या रांगेमध्‍ये इलेक्ट्रिकली फोल्‍डेबल सीट्स, अधिक सुरक्षिततेसाठी 8 एअरबॅग्‍जसह सुसज्‍ज, अॅडप्‍टिव्‍ह विंडशील्‍ड वायपर्ससह इंटीग्रेटेड वॉशर नोझल्‍स असे गाडीमध्ये फिचर्स गाडीमध्ये देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news