

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या डेटिंग संस्कृतीची जगभरात चर्चा सुरू आहे. बहुतेक देशांमध्ये असं बोललं जात आहे की, भारतातील लोक इतर देशांतील लोकांपेक्षा जास्त रोमँटिक आहेत. सध्या एका ऑस्ट्रेलियन मुलीचे रील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या मुलीने भारताच्या डेटिंग संस्कृतीचे खूप कौतुक केले आहे. तिने स्वत: एका भारतीय मुलाला डेट केले आणि तिचा अनुभव शेअर केला आहे.
ब्री स्टील ही ऑस्ट्रेलियन प्रवासी आणि पॉडकास्ट निर्माती आहे. गेल्या काही वर्षांपासून ती नेहमी भारतात पर्यटनासाठी येते. गेल्या वर्षभरापासून भारतात ती प्रवास करत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने भारतातील डेटिंग संस्कृती आणि ऑस्ट्रेलियाच्या डेटिंग संस्कृतीची तुलना केली आहे. ब्री स्टीलने भारताच्या डेटिंग संस्कृतीबद्दल तिचे अनुभवही सांगितले आहेत.
व्हिडिओमध्ये ब्री स्टील सांगते की, ऑस्ट्रेलियात पुरुष टाईमपास म्हणून फ्लर्ट करतात, जे निंदनीय आहे. परंतु भारतातील मुलं खूप चांगली आहेत. येथे नातेसंबंध लवकर जुळतात. ब्री स्टीलने एका पार्टीचे उदाहरण देत सांगितले की, "मी एका पार्टीत गेले होते. तिथे फ्लर्ट करताना एका मुलाने अचानक माझा हात धरला. ऑस्ट्रेलियात असे कधीच होत नाही. भारतातील डेटिंग ऑस्ट्रेलियातील डेटिंगपेक्षा खूप वेगळी आहे. ऑस्ट्रेलियात सर्व काही गोगलगायीच्या गतीने चालते. लोक १० महिन्यांसाठी डेट करतील आणि तरीही अधिकृत होणार नाहीत. भारतात याच्या उलट आहे."
ब्री स्टीलने तिचा भारतातील डेटिंगचा अनुभव शेअर केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबईत एका डेटिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. याबाबत तिने सांगितले की, ते शाळेतील डिस्कोसारखे वाटले. तासभर महिला फक्त इतर महिलांशीच बोलत राहिल्या आणि पुरुषही तेच करत राहिले. महिला-पुरूष एकमेकांसोबत कोणीही मिसळत नव्हते. भारतात डेंटिंग हा आता एक नवीन ट्रेंड आहे.
ब्री स्टील पुढे म्हणते, भारतातील डेटिंगवर बॉलीवूडचा खूप प्रभाव आहे. अनेक लोक चित्रपटाच्या स्क्रिप्टचे अनुकरण करतात. अजुनही भारतात जास्तीत जास्त अरेंज मॅरिज होतात. ऑस्ट्रेलियासारख्या पाश्चात्य देशात अनेक वर्षांपासून डेटिंगची संस्कृती आहे. तेथील शाळांमध्ये लैंगिक शिक्षणावर भर दिला जातो. भारतात सध्या तशी स्थिती नाही. भारतातील लोक त्यांच्या स्वत: नुसार डेटिंग संस्कृती ठरवत असल्याचे तिने म्हटले आहे.