युधिष्ठिराने कुत्र्यासाठी स्वर्ग का नाकारला होता? अखेर देवांनी काय निर्णय घेतला?

एक कुत्रा हस्तिनापूरपासून स्वर्गापर्यंत युधिष्ठिरच्यासोबत होता
Mahabharat Story
युधिष्ठिर कुत्यासोबत स्वर्गात येऊ शकत नाही, अशी देवांची अट होती.
Published on
Updated on

शेवटी फक्त युधिष्ठिर मंदार पर्वताच्या शिखरावर पोहचला. युधिष्ठिराच्या ध्यानात आले की आपण स्वर्गाची राजधानी असलेल्या अमरावतीच्या प्रवेशद्वारजवळ उभे आहोत. युधिष्ठिराच्या समोर सुंदर असा विस्तिर्ण बगीचा होता. देवांनी युधिष्ठिराचे स्वागत केले आणि युधिष्ठिराला स्वर्गात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले.

पण देवांची एकच अट होती, ती म्हणजे युधिष्ठिर फक्त एकटाच स्वर्गात प्रवेश करू शकतो, त्याच्यासोबत आलेला कुत्रा स्वर्गात येऊ शकणार नाही.

आपल्या पाठीमागून एक कुत्रा स्वर्गाच्या द्वारापर्यत आला आहे, याची कल्पना युधिष्ठिराला नव्हती

Mahabharat Story
'कालीमाँ मला मोक्ष नको'|स्वामी विवेकानंद यांचा अखेरचा दिवस कसा होता?

देवांनी कुत्र्याला स्वर्गात प्रवेश नाकारला

"कुत्रा?" स्वतःशीच उद्गारत युधिष्ठिराने मागे वळून पाहिले. त्याच्या पाठीमागे खरोखरच एक कुत्रा उभा होता. युधिष्ठिराला या कुत्र्याची ओळख पटण्यास फारसा वेळ लागला नाही. हा कुत्रा हस्तिनापूरपासून त्याच्यासोबत होता. युधिष्ठिरासोबत कष्टाचा प्रवास करून तोही स्वर्गाच्या द्वारापर्यंत पोहोचला होता.

देवांनी युधिष्ठिराला पुन्हा एकदा बजावले, "कुत्रा तुझ्यासोबत स्वर्गात येऊ शकत नाही, त्याला स्वर्गात प्रवेश नाही."

युधिष्ठिराने या कुत्र्याकडे एक कटाक्ष टाकला. या कुत्र्याकडे पाहून युधिष्ठारचे हृदय द्रवले. तो म्हणाला, "मी सर्व बंधने झुगारली आहेत, हे सत्य आहे. पण हा कुत्रा माझ्यासोबत आहे, त्याने मला कधीच सोडले नाही. हस्तीनापूरपासून ते येथेपर्यंत तो माझ्यासोबत आला आहे. त्यालाही स्वर्गात प्रवेश करण्याचा माझ्या इतकाच अधिकार आहे. माझ्याबरोबर या कुत्र्यालाही स्वर्गात प्रवेश मिळाला पाहिजे."

Mahabharat Story
Narendra Modi : PM माेदी करणार स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्‍ये ध्‍यान, जाणून घ्‍या त्‍याची वैशिष्ट्ये

देवांच्या परीक्षेला युधिष्ठिर उतरला

युधिष्ठिराने ठाम भूमिका घेतली होती, तर देवही त्यांच्या मतावर अटळ होते.

"हे पाहा मी स्वर्गात प्रवेश केला तर हा कुत्राही माझ्यासह स्वर्गात येईल. मला एकट्याने स्वर्गात पोहोचण्याची इच्छा नाही. कुत्र्याला न्याय मिळावा यासाठी मी स्वर्ग नकारत आहे."

एका कुत्र्यासाठी स्वर्ग नकारत युधिष्ठिर देवांच्या परीक्षेला उतरला होता. देव म्हणाले, "हा कुत्रा नाही, तो यमधर्म आहे. तू त्याला सोडायला नकार दिलास, युधिष्ठिरा तू धन्य आहेस."

यानंतर युधिष्ठिराने शंखाच्या निनादात स्वर्गात प्रवेश केला.

संदर्भ - देवदत्त पट्टनायक लिखित, जय - महाभारत सचित्र रसास्वाद, मराठी अनुवाद - अभय सदावर्ते, पॉप्युलर प्रकाशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news