

Venus Rise February 2026
नवी दिल्ली : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह ठराविक काळानंतर अस्त आणि उदित होत असतो. शुक्राच्या या हालचालीचा थेट परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण जगावर होत असतो. येत्या १ फेब्रुवारीला ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह उदित होणार आहे. विशेष म्हणजे, शुक्र ग्रह शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या मकर राशीत उदित होत आहे. या खगोलीय घटनेमुळे ३ राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार असून, त्यांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेवूया या भाग्यकारक राशींबाबत...
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय अत्यंत सकारात्मक ठरेल. शुक्र तुमच्या राशीच्या ११ व्या स्थानी उदित होत असल्याने तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो.या काळात तुम्ही नवीन कौशल्ये, भाषा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाल. प्रेमसंबंधांतील गैरसमज दूर होतील आणि मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय लाभदायक ठरेल. शुक्र तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी उदित होत आहे.विवाहित व्यक्तींचे वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. जोडीदाराची प्रगती होईल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. हा काळ तुमच्या आर्थिक मजबुतीसाठी आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील.अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
शुक्राचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्र तुमच्या राशीच्या 'कर्म' भावात भ्रमण करणार आहे. बेरोजगार तरुणांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊन नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. राजकारण किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना समाजात ओळख आणि मान-सन्मान मिळेल. कुटुंबातील जुने वाद किंवा मालमत्तेशी संबंधित समस्या या काळात सुटू शकतात.