Vastu Tips : बाथरूममध्ये ‘ही’ एक वस्तू कधीही रिकामी ठेवू नका; नाहीतर उडेल बँक बॅलन्स!

घरात आनंद आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आजच हे ३ सोपे बदल करून पाहा.
Vastu Tips
Vastu Tips : बाथरूममध्ये ‘ही’ एक वस्तू कधीही रिकामी ठेवू नका; नाहीतर उडेल बँक बॅलन्स!file photo
Published on
Updated on

vastu tips for money empty bucket bathroom vastu effects bank balance

पुढारी ऑनलाईन :

Vastu Tips : बाथरूममध्ये ठेवलेली रिकामी बादली तुमच्या घरात आर्थिक तंगी आणत आहे का? ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या बादलीचा थेट संबंध घरातील सुख-समृद्धीशी जोडला जातो. घरात आनंद आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आजच हे ३ सोपे बदल करून पाहा.

Vastu Tips
Plant Vastu : घरात लावा ही ६ झाडं; पैसा, सुख-समृद्धी आपोआप येईल!

घरातील मोठी मंडळी नेहमी सांगतात की, बाथरूममध्ये बादली कधीही रिकामी ठेवू नये. अनेक जण याला जुन्या काळातील समजूत किंवा अंधश्रद्धा मानून दुर्लक्ष करतात. मात्र वास्तुशास्त्रात यामागे काही महत्त्वाचे संकेत सांगितले गेले आहेत. जाणून घेऊया, रिकामी बादली तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकते.

पैशांची चणचण आणि वाढता खर्च

वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा थेट संबंध धनाशी मानला जातो. वाहते पाणी जसे थांबत नाही, तसेच रिकामी बादली घरातील अभाव आणि कमतरतेचे प्रतीक मानली जाते. असे म्हटले जाते की, बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवली तर पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्च वाढू शकतो. उलट भरलेली बादली घरातील भरभराट आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

Vastu Tips
Mirror Place Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी लावला असेल आरसा तर त्वरित बदला... करावा लागू शकतो अडचणींचा सामना

घरात वाढते नकारात्मक वातावरण

बाथरूम ही अशी जागा मानली जाते जिथे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, रिकामी बादली ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड, मानसिक ताण आणि वादविवाद वाढण्याची शक्यता असते.

ग्रहांचा प्रभाव

ज्योतिषशास्त्रात पाण्याचा संबंध चंद्राशी तर स्वच्छतेचा संबंध शनि देवाशी जोडला जातो. जर बादली घाणेरडी किंवा रिकामी असेल तर चंद्र आणि शनी यांचे संतुलन बिघडते, असे मानले जाते. त्यामुळे कामात अडथळे येणे, नशीब साथ न देणे अशा समस्या उद्भवू शकतात.

शिस्त आणि मानसिक शांतता

वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर स्वच्छ आणि नीटनेटका बाथरूम मनाला शांतता देतो. भरलेली बादली ही संसाधनांचे योग्य नियोजन आणि शिस्त दर्शवते. तर अस्ताव्यस्त बाथरूम आणि रिकामी बादली ही आळस व निष्काळजीपणाचे प्रतीक मानली जाते.

हे ३ छोटे बदल करू शकतात सकारात्मक परिणाम

रात्री बादली भरून ठेवा : झोपण्यापूर्वी बादली स्वच्छ पाण्याने भरून ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असे मानले जाते.

निळ्या रंगाची बादली वापरा: वास्तुशास्त्रात निळा रंग शुभ मानला जातो. शक्य असल्यास बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली किंवा टब वापरा.

रिकामी बादली उलटी ठेवा : बादली रिकामी ठेवायची असल्यास ती स्वच्छ धुऊन उलटी करून ठेवा.

वरील माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. संबंधित माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे इतकाच हेतू आहे. त्‍यामुळे वाचकांनी तज्ञांचा सल्ला घेउनच निर्णय घ्यावा..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news