Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बेड कोणत्या दिशेला ठेवावा? ५ महत्त्वाचे नियम, आयुष्यात आणतील सकारात्‍मकता

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये बेडची दिशा तसेच भिंतींच्या रंगांची निवड योग्य असणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया, जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी कोणते वास्तुनियम पाळावेत.
bed right direction bedroom
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बेड कोणत्या दिशेला ठेवावा? ५ महत्त्वाचे नियम, आयुष्यात आणतील सकारात्‍मकताfile photo
Published on: 
Updated on: 

vastu tips bed right direction bedroom bedsheet color 5 rules for positivity

पुढारी ऑनलाईन : वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कशी असावी याचे काही नियम आहेत. तुम्ही बेडरूममध्ये बेड योग्य ठिकाणी ठेवला आहे का? बेडरूमशी संबंधित वास्तुशास्त्राचे नियम तुम्हाला माहीत आहेत का? बेडरूममध्ये बेडपासून ते बेडशीट आणि आरशाच्या जागेपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची मानली जाते. चला तर जाणून घेऊया, जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी कोणते नियम पाळावेत.

bed right direction bedroom
Shani Dev : आता वाईट काळ संपणार! शनीच्या सरळ चालीमुळे 'या' ३ राशींना मिळणार मोठा दिलासा!

बेड कोणत्या दिशेला असावा?

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बेड अशा प्रकारे ठेवावा की त्याचे डोक्याकडील बाजूचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीकडे असावे. झोपताना आपले डोके उत्तर दिशेला नसून नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे, याची काळजी घ्यावी.

बेडरूमचा रंग कसा असावा?

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बेडरूम अशी असावी की तिथे मनाला आराम आणि शांतता मिळेल. त्यामुळे बेडरूमच्या भिंतींना हलका गुलाबी, पिवळा, आकाशी किंवा क्रीम रंग द्यावा. बेडरूमसाठी गडद रंगांचा वापर टाळावा.

bed right direction bedroom
Cyber Crime : फ्री मूव्हीच्या लिंकवर एक क्लिक, मोबाईल झाला हँग; अन् महिलेच्या खात्यातून ९.९७ लाख लंपास!

बेडशीटशी संबंधित नियम

बेडशीट निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नेहमी डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या रंगांची बेडशीट वापरावी. बेडरूमसाठी हलक्या रंगांच्या तसेच फुला-पानांची नक्षी असलेल्या बेडशीटची निवड करावी. बेडशीटवर भडक प्रिंट नसावी, याची काळजी घ्यावी. तसेच बेडशीटच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे.

बेडसमोर आरसा लावू नका

वास्तुशास्त्रानुसार, बेडच्या अगदी समोर आरसा लावणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे बेडरूममध्ये आरसा लावण्याची जागा विचारपूर्वक ठरवावी. नियमानुसार, झोपताना आरशात आपले प्रतिबिंब दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. जागेच्या कमतरतेमुळे बेडसमोरच आरसा लावावा लागत असल्यास तो पडद्याने झाकून ठेवावा.

बेडखाली अडगळ ठेवू नका

काही जण बेडखाली विविध वस्तू ठेवतात; मात्र वास्तुशास्त्रानुसार ही योग्य पद्धत मानली जात नाही. बेडखाली कधीही बूट-चप्पल, जड वस्तू किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नयेत. शक्यतो बेडखालची जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. बेडला बॉक्स असल्यास त्यामध्ये केवळ उपयोगी वस्तूच ठेवाव्यात.

या लेखात दिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत किंवा अचूकतेबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.