आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शनिवार, २० जुलै २०२४

आजचे राशिभविष्य : शनिवार, २० जुलै २०२४
Horoscope Today
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?File Photo

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : आज विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : आज विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तरुण आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्‍नशील असतील. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहण्यासाठी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्‍या. व्यवसायाच्या ठिकाणी नोकरदारामुळे काही अडथळे येतील. प्रेमसंबंधांमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील. चुकीच्या आहारामुळे पोट खराब होऊ शकते.

वृषभ : प्रयत्नाअंती योग्य यश मिळेल

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : प्रयत्नाअंती योग्य यश मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. लाभदायक प्रवासाचे योगही आहेत. मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील. घरातील वातावरण योग्य राखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक व्‍यवहार विचारपूर्वक करा. व्यवसायाशी संबंधित योजना उघड करु नका. व्यवसाय आणि वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहू शकता. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

मिथुन : कुटुंबाच्या सुखसोयींसाठीही तुम्ही हातभार लावाल

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : आज तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. कुटुंबाच्या सुखसोयींसाठीही तुम्ही हातभार लावाल. गैरसमजामुळे नात्यात मतभेद होवू शकतात. विनाकारण मनात निराशा राहील. मुलांना खूप सुखसोयी देण्याऐवजी मध्यम जीवन जगायला शिकवा. व्यवसायात तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : आज मनाप्रमाणे काम केल्याने आत्मविश्वास वाढेल

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : आज मनाप्रमाणे काम केल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रभावशाली व्यक्तीशी झालेल्या भेटीमुळे तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. वादविवादापासून लांब रहा. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. इतरांच्‍या व्यवहारात अडकू नका. चुकीचे काम केल्यास जास्त खर्च होऊ शकतो. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो.

सिंह : जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या संकटात मदत कराल

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या संकटात मदत कराल. मालमत्ता खरेदीबाबात गांभीर्याने विचार करा. कोणावरही टीका करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. विद्यार्थी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील. कामकाजात अंतर्गत व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय राखला जाईल. वातावरणामुळे सांधेदुखी होऊ शकते.

कन्या : जोडीदाराचा पाठिंबा मिळेल

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : आज ज्ञानवर्धक कार्यात वेळ व्‍यतित केल्‍याास मनःशांती मिळेल. अचानक तुम्हाला एक चांगली सूचना मिळेल. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. अन्‍यथा तुम्‍ही षड्यंत्राला बळी पडू शकता. भावनिक आधाराची गरज भासेल. ध्यान आणि धार्मिक ठिकाणी काही वेळ व्‍यतित करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून ग्रहमान अनुकूल राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्‍या.

तूळ : आज दिवसाची सुरुवात आनंददायी असेल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : आज दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. मेहनतीनुसार नफा मिळेल. सामाजिक कार्यातही तुमचे योगदान असेल. घरातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. मुले स्वतःच्या काही समस्येमुळे तणावात राहतील. कुटुंबीयांच्या मदतीने लवकरच परिस्थिती निवळली जाईल. पती-पत्नी सुसंवाद साधून उत्तम कुटुंबव्यवस्था राखतील. प्रकृती चांगली राहिल.

वृश्चिक : ठराविक वेळेत काम पूर्ण होईल

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : ठराविक वेळेत काम पूर्ण होईल. नवीन काही शिकाल. संभाषण करताना नकारात्मक शब्द वापरू नका, अन्‍यथा कामात अडथळा निर्माण होईल. व्यापार-व्यवसायात काही लाभदायक सूचना मिळतील. पती-पत्नी व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देऊ शकणार नाहीत. असंतुलित आहारामुळे पोटात जळजळ आणि ॲसिडिटी सारख्या समस्या असतील.

धनु : घरात पाहुण्यांचे आगमन झाल्‍याने वेळ आनंदाने जाईल

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : घरात पाहुण्यांचे आगमन झाल्‍याने वेळ आनंदाने जाईल. घराच्या देखभालीच्या कामांशी संबंधित खर्च जास्त असतील ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होईल. जवळच्या व्यक्तीशी गैरसमज झाल्याने मतभेद होऊ शकतात. व्यावसायिक कामांसाठी हा काळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मकर : तुम्‍हाला नवीन यश मिळेल

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्‍हाला नवीन यश मिळेल. संवाद कौशल्‍याने सर्व अडथळ्यांवर मात कराल. नियोजनाबरोबर प्रत्‍यक्ष कृती करण्‍याबाबत निर्णय घ्‍या. अतिविचारात वेळ निघून जाऊ शकतो. कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहिल.

कुंभ : तुम्ही तणावमुक्त व्हाल

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : घरातील सदस्यांच्या सहकार्याने तुमची बहुतेक इच्छित कामे पूर्ण होतील. तुम्ही तणावमुक्त व्हाल . काही नकारात्मक परिस्थिती तुम्हाला त्रास देतील परंतु तुम्ही तुमच्या क्षमतेद्वारे त्यावर उपाय शोधू शकाल. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कार्यक्षेत्रात अंतर्गत सुव्यवस्था व्यवस्थित राखली जाईल. पती-पत्नीमध्ये सामंजस्य नसल्यामुळे तणाव राहील. सर्दी-खोकल्याचा त्रास संभवतो.

मीन : वैवाहिक जीवन आनंदी राहिल

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : घरातील मुलांच्या किलबिलाटाची शुभ माहिती मिळाल्याने उत्साही वातावरण निर्माण होईल. नवीन वस्तूंची खरेदीही कराल. मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित पार्टीचेही आयोजन केले जाईल. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या विरोधात काही योजना करू शकतात त्यामुळे सावध रहा. विपरीत परिस्थितीत राहिल्यानेही तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. सध्याच्या वातावरणाचा निष्काळजीपणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news