

श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवाची आराधना केली जाते. सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत १०८ वेळा रोज बेल वाहावे, असे धर्मअभ्यासक सांगतात.
दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहावे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहावे. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहावे. पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे.
लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करावे. श्रावण महिन्यात श्री शिवलिलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा. जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारीही हा अध्याय वाचू शकता.
परळी-वैजनाथ जि. बीड : हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या भाळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
औंढा नागनाथ जि. हिंगोली : याचे प्राचीन नाव आमर्दक, ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात झाल्याचे मानले जाते.
त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक : हे नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झालेला आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्थ सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
भीमाशंकर, जि. पुणे : हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असणारी भीमा नदी उगम पावते. हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली.
घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर: दौलताबादपासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे.