

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, वैभव, प्रेम, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. हा ग्रह एका राशीत साधारणपणे २६ दिवस वास्तव्य करतो.
shukra Uday February 2026
नवी दिल्ली : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत. सुख, समृद्धी आणि वैभवाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह तब्बल ५३ दिवसांच्या 'अस्त' अवस्थेनंतर मकर राशीत उदय होणार आहे. या शुक्रोदयामुळे काही राशींच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, वैभव, प्रेम, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. हा ग्रह एका राशीत साधारणपणे २६ दिवस वास्तव्य करतो. सध्या शुक्र मकर राशीत बुध, सूर्य आणि मंगळासोबत विराजमान आहे, मात्र तो 'अस्त' स्थितीत असल्याने पूर्ण शुभ फळ देऊ शकत नव्हता. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:२७ वाजता शुक्र ग्रहाचा उदय होईल. या बदलाचा सकारात्मक परिणाम प्रामुख्याने तीन राशींवर दिसून येईल.
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचा उदय अत्यंत फलदायी ठरणार आहे. विशेषतः करिअरच्या क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कौशल्याचे कौतुक होईल. पदोन्नतीबरोबर वेतनवाढीचे प्रबळ योग आहेत. तसेच कौटुंबिक सौख्य लाभेल आणि जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून जीवनशैली अधिक ऐषारामी राहील.
वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र नवव्या स्थानी उदित होत असल्याने त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारल्याने कामात सुलभता निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन मन प्रसन्न राहील.
मकर राशीच्या लग्नस्थानीच शुक्राचा उदय होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. धन-धान्यात वृद्धी होईल आणि आर्थिक बाजू भक्कम होईल. आत्मविश्वास वाढल्याने कामात सकारात्मक परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात माधुर्य येईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.