Shukra Gochar 2026: शुक्रदेवाची प्रत्येक क्षेत्रात कृपादृष्टी... होळीपर्यंत या ३ राशींवर पडणार पैशाचा पाऊस

Horoscope Shukra Gochar 2026: या काळात ज्ञान, आध्यात्म आणि विस्तार यांच्याशी संबंधित सकारात्मक संकेत मिळत आहेत.
Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026pudhari photo
Published on
Updated on

Horoscope Shukra Nakshatra Parivartan: भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची बदलती चाल ही आपल्या जीनवनावर परिणाम करत असते. येत्या २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी शुक्र शतभिषा नक्षत्र सोडून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रेवश करत आहे. ये शुक्र गोचरचा ४ मार्चपर्यंत प्रभाव राहणार आहे. यानंतर शुक्र उत्तराभाद्रपद नक्षत्राकडे कूच करणार आहे. पूर्वाभाद्रपदाचे स्वामी हे गुरू आहेत. त्यामुळं या काळात ज्ञान, आध्यात्म आणि विस्तार यांच्याशी संबंधित सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Shukra Gochar 2026
Horoscope 21 February 2026: करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थिती काय सांगते? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य!

पूर्वी भाद्रपद नक्षत्र हे चिंतन, गुप्त उर्जा आणि आत्मिक बदल यांचे प्रतिनिधित्व करतं. ज्यावेळी शुक्र या नक्षत्रात येतो त्यावेळी प्रेम, कला, ऐश्वर्य आणि सुख सुविधांमध्ये वाढ होण्याचा योग असतो. हा काळ रचनात्मकतेला प्रोत्साहन देणे, मानसिक शांतता आणि नाती बळकट करण्यासाठी अनुकूल मानला जातो. आर्थिक स्तरावर देखील चांगले फळ मिळण्याची शक्यता असते. चला तर मग कोणत्या ४ राशींना या काळात चांगला फायदा होणार आहे याची माहिती घेऊयात.

Shukra Gochar 2026
Budh And Shani Yuti 2026 | ३० वर्षांनंतर शनी-बुधाचा 'दुर्मिळ योग' 'या' राशींसाठी ठरणार वरदान!

कर्क

कर्क राशीच्या लोकांना शुक्र गोचरचा काळ करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले करणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे मार्गी लागतील. नवीन संधी निर्माण होतील. प्रेमाच्या आघाडीवर गंभीरपणा आणि समजुद्दारपणा वाढेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. सेव्हिंग वाढण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना हा काळ अनुकूल राहणार आहे. प्रवास किंवा नव्या योजनेची सुरूवात सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे.

Shukra Gochar 2026
Annual Horoscope 2025 | मेष | हिमतीने पावले टाका, यश मिळेल

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना हा काळ यश घेऊन येणार आहे. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन ओळखी होतील. या ओळखी भविष्यात लाभ देतील. प्रेमाच्या पातळीवर सांमजस्य आणि रोमँटिकपणा वाढेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती हळू हळू भक्कम होईल. क्रिएटिव्ह कामात आणि आध्यात्मात रस वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको, दैनंदिन कामात नियमितपणा पाळा.

वृषभ

या राशीच्या लोकांना या काळात नातेसंबंध एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहेत. वैवाहिक जीवनात देखील गोडवा राहणार आहे. कुटुंबात सहकार्याचं वातावरण राहील, कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाला एक ओळख मिळणार आहे. पदोन्नती किंवा आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्राशी निगडीत असाल तर तुमची गुणवत्ता उजळून निघणार आहे. गुंतवणुकीबाबतचे निर्णय देखील लाभदायक ठरतील. मात्र विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्थीर आणि आत्मविश्वासपूर्ण फील कराल.

Shukra Gochar 2026
Shani Nakshatra Parivartan: २० जानेवारीला शनी नक्षत्र बदलणार; ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार!

कन्या

कन्या राशीच्या लोकांना या काळात अर्थिक बळकटी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना आणि निर्णय क्षमता यांचं कौतुक होणार आहे. प्रेम जीवनात स्थैर्य मिळेल. नात्यात विश्वास वाढेल. नवीय योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही संतुलित राहणार आहे. जुन्या चिंता मिटतील. आरोग्य सुधारेल आणि दैनंदिन कार्यात देखील सुधारणा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news