

मूर्तिमंत, चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्ट्य आहे.युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाड्यात धैर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. संकटकाळी न घाबरणारी आपली रास आहे.
मेष मूर्तिमंत, चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्ट्य आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाड्यात धैर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. संकटकाळी न घाबरणारी आपली रास आहे.
या राशीच्या व्यक्तींना सुरुवातीलाच सांगावयास हवे की, दि. ३०/०३/२०२५ पासून मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे. सामान्यतः आरोग्य चांगले राहणार आहे. वर्षभर गुरूची साथ चांगली असणार आहे. त्यामुळे फार काळजी करण्याचे कारण नाही. खालील जे प्रतिकूल कालखंड दिलेले आहेत त्या काळात आरोग्याची काळजी घ्यावयाची आहे. आजारपण येणार नाही, याकडे लक्ष द्यायचे आहे. दि. ३०/०३/२०२५ पासून सर्व व्यवहारांकडे चांगले लक्ष असून द्यावे.
दि. ०१/०१/२०२५ ते दि. २८/०७/२०२५ दि. १४/०९/२०२५ ते दि. २६/१०/२०२५ दि. ०७/१२/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५ व्यवसाय व आर्थिक स्थिती व्यवसाय व आर्थिक लाभ, उद्योगधंदा, व्यापाराच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. स्थूलमानाने दि. ०१/०१/२०२५ ते दि. १४/०५/२०२५ व दि ०५/१२/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५ हा कालखंड सामान्यतः चांगला जाईल.
दि. १८/१०/२०२५ ते दि. ०४/१२/२०२५ वा कालखंडात व्यवसायात वाढ होईल. सामान्यतः व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार या गोष्टी समाधानकारक चालणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कर्मचारीवर्गचि सहकार्य चांगले लाभेल. बाजारपेठेचा अभ्यास करून शांतचित्ताने आपण व्यवसाय, व्यापार करू शकता. दि. ०१/०१/२०२५ दि. १४/०५/२०२५ या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायाची एखादी शाखा सुरू करू शकता.
दि. ०१/०१/२०२५ ते दि. २६/०१/२०२५ दि. ०१/०७/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ दि. १५/०९/२०२५ ते दि. ०८/१०/२०२५ दि. ०२/११/२०२५ ते दि. २५/११/२०२५
नोकरीतील मेष राशीच्या व्यक्तींना दि. ०१/०१/२०२५ ते दि. १४/०५/२०२५ हा कालखंड अत्यंत समाधानकारक जाणार आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. तुमच्या कर्तृत्वाला व अनुभवाला संधी मिळेल. काहींना बढ़तीची शक्यता आहे. तुमच्या बढतीच्या व - प्रगतीच्या आड कोणी येऊ शकणार नाही. वरील कालखंडात शत्रुपिडा नाही. ज्या व्यक्ती मुळातच अधिकारावर आहेत, त्यांना हाताखालील लोकांचे - चांगले सहकार्य मिळणार आहे. या कालखंडात तुम्ही चांगल्या संधीची अपेक्षा करू शकता. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे.
दि. १३/०४/२०२५ ते दि. १४/०५/२०२५ दि. ०१/०६/२०२५ ते दि. १६/०७/२०२५ दि. १६/०८/२०२५ ते दि. १५/०९/२०२५ दि. ०६/१२/२०२५ ते दि. ३१/१२/२०२५ खालील कालखंडात नोकरीतील व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा खालील कालखंडात नोकरीतील व्यक्तींनी अयोग्य गोष्टींपासून दूर राहावे.
प्रॉपर्टी व गुंतवणूक या दृष्टीने तसेच नवीन जागा, बंगला, फ्लॅट, वाहन खरेदी यासाठी मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. त्यासाठी खालील कालखंड अनुकूल ठरतील. दि. ०१/०७/२०२५ ते दि. २६/०७/२०२५ दि. २१/०८/२०२५ ते दि. १४/०९/२०२५ दि. ०२/११/२०२५ ते दि. १६/११/२०२५
संततिसौख्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तीना हे वर्ष समाधानकारक आहे. स्थूलमानाने दि. ०१/०१/२०२५ ते दि. १७/१०/२०२५ हा कालखंड चांगला आहे.
या कालखंडात मेष राशीच्या व्यक्तींना संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्न व निकाल या गोष्टी मनासारख्या होतील. विद्याथ्यांना सुयश मिळेल. योग्य शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील.
मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. दि. ३०/०३/२०२५ पासून शनीची कुटुंबस्थानावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर दृष्टी राहणार आहे, त्यामुळे काही कमी उणे राहण्याची शक्यता आहे, मात्र दि. ०१/०१/२०२५ ते दि. १७/१०/२०२५ हा कालखंड वैवाहिक सौख्याला चांगला आहे. विशेषतः दि. ०१/०१/२०२५ ते दि १७/१०/२०२५ हा कालखंड विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह होण्याच्या दृष्टीने, शुभ कार्याच्या दृष्टीने चांगला आहे. घरात शुभ कार्य होणे, मंगलकार्य होणे, साखरपुडा, विवाह व कोणत्याही शुभ कार्यासाठी वरील कालखंड चांगला आहे. दि. १९/१०/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५ या कालखंडात गुरू चौथ्या स्थानात असल्यामुळे हा कालखंड विवाहासाठी प्रतिकूल आहे.
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली यासाठी हे संपूर्ण वर्ष कमी-अधिक प्रमाणात निमादीवटी प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील.
प्रवासाच्या दृष्टीने चांगला कालखंड दि.
०३/०६/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ दि. १४/०९/२०२५ ते दि. १८/१०/२०२५
खालील कालखंडात प्रवास शक्यतो टाळावेत
दि. २१/०८/२०२५ ते दि. १३/०९/२०२५ दि. १७/११/२०२५ ते दि. १८/१२/२०२५
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने या वर्षातील बराचसा कालखंड चांगला आहे. गुरूची भ्रमणे अनुकूल आहेत, तर राहू दि. ३०/०५/२०२५ पासून अनुकूल आहे. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, वृत्तपत्र, कायदा, प्रसारमाध्यमे, नाट्य, रंगभूमी या सर्व क्षेत्रांत तुम्ही बऱ्यापैकी आघाडी मिळवूशकाल. आरोग्य, आर्थिक स्थिती, नोकरी इतर बाबतीत जशी काही उलथापालथ होऊ शकते
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धीसाठी अनुकूल दि. २८/०१/२०२५ ते दि. ३०/०५/२०२५ दि. ०६/०६/२०२५ ते दि. २२/०६/२०२५ दि. २६/०७/२०२५ ते दि. २०/०८/२०२५ दि. १५/०९/२०२५ ते दि. ०२/१०/२०२५ दि. ०२/११/२०२५ ते दि. २६/११/२०२५ दि. ०६/१२/२०२५ ते दि. २८/१२/२०२५
मानमान्यता सार्वजनिक कार्य, राजकारण, समाजकारण या सर्व दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना सामान्यतः दि. १५/०५/२०२५ ते दि. १८/१०/२०२५ हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात तुम्हाला सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल.
मान, प्रतिष्ठेसाठी अनुकूल कालखंड
दि. १५/०१/२०२५ ते दि. १२/०२/२०२५ दि. १५/०६/२०२५ ते दि. १६/०७/२०२५ दि. १४/०९/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५
व्यवसायाच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष अनुकूल आहे. मात्र, या सर्व गोष्टीला साडेसातीची एक किनार आहे.