Shani Nakshatra Parivartan 2026 | शनिदेवांची ५ महिने 'या' राशींवर होणार अलोट कृपा; लाभणार सुख-वैभव!

शनिदेव 'उत्तराभाद्रपद' नक्षत्रातून बाहेर पडून 'रेवती' नक्षत्रात प्रवेश करणार
Shani Nakshatra Parivartan 2026
प्रतीकात्मक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

Shani Nakshatra Parivartan 2026 |

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार, २०२६ मधील शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन अनेक राशींसाठी दिलासादायक आणि प्रचंड लाभदायी ठरणार आहे. १७ मे २०२६ रोजी शनिदेव 'उत्तराभाद्रपद' नक्षत्रातून बाहेर पडून 'रेवती' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शनि याच नक्षत्रात विराजमान राहतील. या ५ महिन्यांच्या कालावधीत काही ठराविक राशींसाठी अतिशय शुभ मानली जात असून, त्यांचे जीवन ऐश्वर्यसंपन्न होऊ शकते. ज्यांना दीर्घकाळ मेहनत करूनही योग्य फळ मिळत नव्हते, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. करिअर, आर्थिक उत्पन्न आणि कौटुंबिक आघाडीवर कोणत्या राशींना ही खुशखबर मिळणार आहे... जाणून घेवूया शनिदेवाची विशेष कृपा राहणार्‍या भाग्‍यवान राशींविषयी....

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह राशीच्‍या जातकांच्‍या प्रलंबित कामात मिळणार गती

सिंह राशीच्या जातकांसाठी शनीचे रेवती नक्षत्रातील भ्रमण फायदेशीर ठरेल. पैशांशी संबंधित अडचणी हळूहळू दूर होतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत मोठी संधी मिळेल. तसेच व्यवसायात एखादी महत्त्वाचा करार होण्‍याचे' मिळण्याचे योग आहेत. प्रलंबित सरकारी कामे मार्गी लागतील. तुम्‍ही मांडलेले विचार लोक गांभीर्याने घेतील. आरोग्यामध्येही सकारात्मक सुधारणा दिसून येईल.

Shani Nakshatra Parivartan 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध
Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु राशीच्‍या जातकांची होणार मानसिक तणावातून सुटका

धनु राशीच्‍या जातकांसाठी १७ मेपासूनचे आगामी ५ महिने अत्यंत दिलासादायक असतील.मनातील विनाकारण चाललेला तणाव कमी होऊन विचारांमध्ये स्पष्टता येईल. तरुणांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात आनंदाच बातमी मिळेल.

Shani Nakshatra Parivartan 2026
Astrology Predictions 2026: गुरु-मंगळ ग्रहाचे वर्चस्व, २०२६ वर्ष भारतासह जगासमोरील आव्हाने वाढविणार!

मकर राशीच्‍या जातकांचे मालमत्तेचे प्रश्न सुटणार

मकर राशीच्या स्वामींच्या विशेष कृपेमुळे या जातकांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडतील. घरातील एखादी मोठी चिंता दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल. लग्नकार्य किंवा शुभ समारंभाचे योग येतील.जुन्या मालमत्तेचे किंवा जमिनीचे रखडलेले वाद तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे.जुन्या मित्रांकडून मदत मिळेल आणि जुन्या संपर्कांचा वापर करून तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news