Shani Nakshatra Parivartan 2026 : "शनी देव चाल बदलणार! आजपासून १११ दिवस या ५ राशींवर असणार शनीची कृपा, मिळणार बंपर लाभ"

शनी देव आपल्‍या स्थितीत जेव्हा बदल करतात तेव्हा त्याचा मोठा प्रभाव प्रत्येक राशीवर दिसून येतो

Shani Nakshatra Gochar 2026
Shani Nakshatra Gochar 2026AI-generated image
Published on: 
Updated on: 

Shani Nakshatra Parivartan 2026 : ज्‍योतिषशास्‍त्रानुसार, ९ ऑक्टोबरच्या सायंकाळी शनी देवांनी आपले नक्षत्र बदलले आहे. शनी देव जेव्हा आपल्‍या स्‍थितीत परिवर्तन करतात त्याचा मोठा प्रभाव जवळपास प्रत्येक राशीवर दिसून येतो. सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करत असून आता ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते याच नक्षत्रात राहणार आहेत. म्हणजेच आजपासून तब्बल १११ दिवस शनी याच नक्षत्रात असणार आहेत. या बदलाचा ५ राशींच्या आयुष्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र बदलाचा कोणत्‍या राशींवर सकारात्‍मक परिणाम होणार आहे याबाबत...

वृषभ राशीच्‍या जातकांना नोकरीसह व्‍यवसायात यश

वृषभ राशीच्या लोकांना पुढील १११ दिवस प्रत्येक पावलावर नशिबाची साथ लाभेल. कामातील अडथळे दूर होतील. कामे वेगाने मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना यादरम्यान एखादा असा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे सुरुवातीला परिस्थिती थोडी कठीण वाटू शकते, पण वेळेनुसार सर्व काही सुरळीत होईल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे बरीच कामे मार्गी लागतील.


Shani Nakshatra Gochar 2026
Venus vs Mercury | ‘बुध’ सूर्याच्या अधिक जवळ असूनही ‘शुक्र’ जास्त उष्ण का?

मिथुन राशीच्‍या जातकांची रखडलेली कामे लागतील मार्गी

आजपासून पुढील १११ दिवस शनीची कृपा मिथुन राशीच्या लोकांवरही संवर्षाव करणार आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत मिथुन राशीच्या लोकांना भरघोस लाभ होईल. एखादे महत्त्वाचे काम जे आतापर्यंत रखडले होते, ते आता हळूहळू योग्य दिशेने पुढे जाईल. व्यावसायिक जीवनात योग्य मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे सर्वकाही उत्तम होईल. फक्त कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका.

तूळ राशीच्‍या जातकांची आर्थिक स्‍थिती होईल भक्‍कम

शनीच्या बदललेल्या स्थितीचा सकारात्मक प्रभाव तुला राशीच्या लोकांवरही पडणार आहे. आजपासून पुढील १११ दिवसांच्या काळात नोकरीतील परिस्थितीत मोठा बदल होईल, ज्यामुळे मोठा दिलासा लाभेल. पदोन्नतीची (प्रमोशन) दाट शक्यता आहे. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमची कामे योग्य पद्धतीने पूर्ण करू शकाल. जर आतापर्यंत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असेल, तर आगामी काळ परिस्थिती सुधारणारा ठरेल. आर्थिक स्थिती बऱ्याच अंशी भक्कम होईल. शनीकृपेमुळे तुला राशीची सर्व रखडलेली कामे पूर्ण होत जातील.


Shani Nakshatra Gochar 2026
Beta Pictoris b | ‘गुरु’पेक्षा ११ पट महाकाय ग्रह सापडला!

मकर राशीच्‍या जातकांना जुन्‍या गुंतवणुकीत होईल लाभ

मकर राशीच्या जातकांसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नोकरदार वर्ग केलेल्या कष्टाचे उत्तम फळ मिळेल. तसेच, ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा डीलच्या पूर्ततेमुळे मोठा फायदा होईल. यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाल्याने मनाला मोठा दिलासा मिळेल. एखादी जुनी गुंतवणूक भरघोस परतावा देऊ शकते.

कुंभ राशीच्‍या जातकांच्‍या व्‍यवसायात होईल प्रगती

कुंभ राशीच्या जातकांना शनीच्या बदललेल्या स्थितीमुळे मोठा फायदा होईल. आजपासून सुमारे १११ दिवस या राशीची सर्व कामे हळूहळू मार्गी लागत जातील. या राशीवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे, त्यामुळे काही गोष्टींचा वेग मंद असला, तरी परिस्थिती सतत सुधारत जाईल. नोकरदार वर्गाला कुठूनतरी एखादी उत्तम ऑफर मिळू शकते. व्यावसायिक लोकही या काळात मोठी प्रगती पाहायला मिळतील. यादरम्यान आर्थिक स्थिती बऱ्याच अंशी सुधारलेली असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news