Sarva Pitru Amavasya 2026: आज सर्वपित्री अमावस्या: या शुभ काळात पितरांना निरोप द्या, जाणून घ्या श्राद्ध आणि विधीचे नियम

हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्या हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो.
Sarva Pitru Amavasya 2026
Sarva Pitru Amavasya 2026File Photo
Published on: 
Updated on: 

Sarva Pitru Amavasya 2026:

नवी दिल्ली: हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्या हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, आज (दि. १०) सर्वपित्री अमावस्या साजरी केली जात आहे. याला 'महालय अमावस्या' किंवा 'पितृ विसर्जनी अमावस्या' असेही म्हटले जाते. या दिवसासोबतच यंदाच्या पितृ पक्षाची सांगता होत असून, उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे.

ज्या पूर्वजांच्या मृत्यूची अचूक तिथी माहिती नसते किंवा पितृ पक्षादरम्यान ज्यांचे श्राद्ध करणे राहिले असेल, अशा सर्व पूर्वजांचे श्राद्ध आणि पिंडदान आजच्या दिवशी केले जाते.

सर्वपित्री अमावस्या: तिथी आणि वेळ

तिथी प्रारंभ: ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३५ वाजता

तिथी समाप्त: १० ऑक्टोबर रोजी रात्री ९:१९ वाजता

श्राद्ध व तर्पणाचे शुभ मुहूर्त

कुतुप मुहूर्त: सकाळी ११:५५ ते दुपारी १२:४१ पर्यंत

रोहिण मुहूर्त: दुपारी १२:४१ ते दुपारी १:२८ पर्यंत

अपराह्न काळ: दुपारी १:२८ ते दुपारी ३:४९ पर्यंत

सर्वपित्री अमावस्या श्राद्ध विधी

सर्वपित्री अमावस्या तिथीला सकाळी स्नान आटोपल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसावे. तांब्याच्या लोट्यात काळे तीळ, जव, तांदूळ, कुश (दर्भ) आणि शुद्ध पाणी घ्यावे. हातामध्ये कुश घेऊन आणि पाण्यात तीळ मिसळून पितरांचे स्मरण करत तीन वेळा जल अर्पण करावे. यानंतर शिजवलेले तांदूळ, काळे तीळ आणि तूप एकत्र करून पिंड तयार करावेत आणि ब्राह्मणांना भोजन घालावे. या दिवशी गाय, कुत्री, कावळे, देव आणि मुंग्या यांच्यासाठी अन्नाचा घास काढण्याला विशेष महत्त्व आहे. पूजा आणि विधीच्या शेवटी श्राद्ध करताना घडलेल्या कोणत्याही चूकीबद्दल पितरांकडे क्षमा मागितली जाते.

या चुका टाळाव्यात

पितृ पक्षाच्या या अंतिम दिवशी पितरांना निरोप दिला जातो. त्यामुळे खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी:

काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे.

कोणाशीही वाद किंवा भांडण करू नये.

कोणाबद्दलही मनात कटू किंवा वाईट विचार आणू नयेत.

महिला आणि ज्येष्ठांचा अपमान करू नये.

तामसिक अन्नाचे सेवन टाळावे.

दानाचे महत्त्व

सर्वपित्री अमावस्या तिथीला दानाला विशेष महत्त्व आहे. श्राद्धविधी पूर्ण झाल्यानंतर मंदिरात किंवा गरजूंना अन्न, काळे तीळ, तूप आणि वस्त्र इत्यादींचे दान करावे. धार्मिक मान्यतेनुसार, या वस्तूंचे दान केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद लाभतात.

टीप: ही सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित असून, सामान्य माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news