

शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी दुपारी ३:३८ वाजता शुक्र आणि यम (प्लूटो) एकमेकांपासून ३ अंशांवर असतील, यामुळे 'द्विद्वादश योग' तयार होणार आहे.
Rare Venus Dwidwadash Yog After 248 Years
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीत लवकरच एक मोठा फेरबदल होणार आहे. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा 'शुक्र' आणि 'यम' (प्लूटो) यांच्या संयोगातून अत्यंत शक्तिशाली 'द्विद्वादश योग' निर्माण होत आहे. तब्बल २४८ वर्षांनंतर असा दुर्मिळ योग जुळून येत असून, यामुळे काही राशींचे नशीब पालटण्याची शक्यता आहे. विशेषतः तीन राशींच्या जातकांसाठी हा काळ 'लॉटरी' लागण्यासारखा असेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, २६ डिसेंबर रोजी दुपारी ३:३८ वाजता शुक्र आणि यम (प्लूटो) एकमेकांपासून ३ अंशांवर असतील, ज्यामुळे हा राजयोग तयार होईल. सध्या शुक्र धनु राशीत असून तिथे मंगल आणि सूर्याचीही उपस्थिती आहे. शुक्र-यमाचा हा संयोग १२ महिन्यांनंतर येत असला तरी, २४८ वर्षांनंतरची ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ मानली जात आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी 'द्विद्वादश योग' आर्थिक भरभराट घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि प्रलंबित इच्छा पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून दुप्पट परतावा मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी मिळू शकते. पदोन्नती आणि नवीन नोकरीच्या संधी चालून येतील.
मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ सुख-सुविधांमध्ये वाढ करणारा ठरेल. २४८ वर्षांनंतर बनणारे हे समीकरण तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढवेल. परदेशात शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील आणि नात्यात गोडवा निर्माण होईल.
वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्याने या योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव या राशीवर पडेल. २६ डिसेंबरनंतर नशिबाची पूर्ण साथ लाभेल. त्यांचे घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल आणि कार्यक्षेत्रात वर्चस्व राहिल.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.