Ram Navami 2026: राम नवमी 'या' राशीच्या लोकांसाठी ठरणार भाग्यकारी... धनलाभ, गुंतवणूक परतावा अन् व्यापाराबाबत खुशखबरी

Ram Navami 2026
Ram Navami 2026pudhari
Published on
Updated on

Ram Navami 2026 Predictions: द्रिक पंचांगानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमीला राम नवमी साजरी केली जाते. या वर्षी २६ आणि २७ मार्च या दोन्ही दिवशी राम नवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान रामांची पूजा करणे आणि कन्या पूजन करण्याने आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोणातून देखील हा दिवस खास मानला जात आहे. या काळात शुक्र ग्रह हा मेष राशीत प्रवेश करणार आहे तसेच तो अश्विनी नक्षत्रात स्थीर होणार आहे. याचसोबत गुरू आणि चंद्र यांची युती गजकेसरी राजयोग निर्माण करते. याचा देखील प्रभाव या काळात लाहणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ, करिअर ग्रोथ आणि आनंदावार्ता मिळण्याची शक्यता आहे.

Ram Navami 2026
Shani Asta 2026: शनी अस्त, साडेसातीमध्ये मिळणार मोठा दिलासा... या तीन राशींना होणार फायदा

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना हा काळ चांगलाच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. धनलाभाचे चांगले योग निर्माण होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. याच काळात काही प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी देखील होण्याची शक्यता आहे. या गाठी भेटींचा पुढे जाऊन फायदा होणार आहे. परदेशी कामांच्या बाबतीत देखील सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या लोकांना हा काळ नव्या योजना पुढे नेण्याचा आहे. भविष्यात याचा चांगला लाभ मिळणार आहे.

Ram Navami 2026
Shani Asta 2026 | 'न्यायदेवता' शनीचा लवकरच होणार मीन राशीत अस्त, 'या' राशींच्या करिअर आणि व्यवसायावर होणार सकारात्मक परिणाम

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना राम नवमीच्या काळात यश आणि दिलासा दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही यापूर्वी काही ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना देखील चांगली बातमी मिळू शकते. उद्योग करणाऱ्या लोकांना समाधानकारक परिणाम मिळतील. कामकाजात स्थैर्य लाभेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनाप्रमाणे संधी मिळणार आहे. जुनी अडकलेली कामे पूर्ण होण्याचे देखील संकेत मिळत आहेत. कायदेशीर कामात देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Ram Navami 2026
Shani Nakshatra Parivartan 2026: शनीदेव आज बदलणार आपली चाल... साडेसाती सुरू असलेल्या या राशींच्या लोकांना होणार जबरदस्त लाभ

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना राम नवमीचा काळ हा नवी सुरूवात करण्यासाठीचे संकेत देत आहे. करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी चालून येतील. या काळात प्रवासाचा देखील योग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आरोग्य पूर्वपेक्षा चांगलं होणार आहे. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आत्मविश्वास वाढेल, भविष्याबाबत नवीन विचार समोर येतील. याबाबत प्रस्ताव देखील येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news