

Premanand Maharaj Advice: भारतासह अनेक देशात अन् अनेक ठिकाणच्या संस्कृतीत नदी, विहिरी आणि झऱ्यांमध्ये पैशाची नाणी टाकून इच्छा व्यक्त करण्याची परंपरा आहे. धार्मिक दृष्टीकोणातून पाहिले तर याला देवावर असलेली श्रद्धा आपली इच्छा आकांशी पूर्ण करण्याशी जोडले जाते. जर धार्मिक ग्रंथांचा विचार केला तर नदीत पैशाची नाणी टाकण्याबाबत कोणतीही स्पष्ट मान्यता आढळून येत नाही. याला एक व्यक्तिगत विश्वास अशाच प्रकारे पाहिले जाते. याला धर्माशी जोडले जात नाही.
याबाबत मथुरा वृंदावनमधील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या एका भक्ताने प्रश्न विचारला. त्यावर प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिलं.
नदीत पैशाची नाणी टाकण्याच्या परंपरेबाबत प्रेमानंद महाराज म्हणतात, 'गंगाजी असो किंवा यमुनाजी असो त्यांच्यासाठी १ रूपयाचे पीठ घ्या आणि त्यापासून छोटी चपाती किंवा रोटी तयार करून ती नदीत टाका. त्यामुलं नदीत राहणाऱ्या जीवांना जसे की मासे, कासव यांना सर्वांना खाद्य मिळेल. गंगेत पैसे टाकण्याने काही होणार नाही. शास्त्रात याची कोणतीही अनुमती नाही. या सर्व मनमानी प्रथा आहेत.'
प्रेमानंद महाराज म्हणाले की, 'लोकांनी आजकाल आपली मनमानी करणं सुरू केलं आहे. नदीत सिक्के टाकून काही होत नाही. आपल्या नद्या प्रदुषित होतात. आम्ही कोणत्यातरी घाटावर पाहिलं आहे की तिथं छोटी छोटी मुले लोह चुंबक घेऊन ती नाणी बाहेर काढतात आणि घेऊन जातात. त्यामुळं कोणाचं भलं होत नाही. जिथं जास्त यात्री येतात तिथं ही मुले पोहचतात.'
महाराज पुढे म्हणतात, 'जर तुम्ही दान म्हणून १०० रूपये देणार असाल तर १०० देण्यापेक्षा त्याचा चारा खरेदी करून तो गायीला द्या. किंवा ते १०० रूपये आजारी व्यक्तीला मदत म्हणून द्या. कोणाला तरी १०० रूपयांचे भोजन घेऊन द्या. असे पैसे फेकून काही होत नाही. त्यामुळं श्रद्धेसोबतच आपल्या विवेकाचा देखील वापर करणं गरजेचं आहे. यामुळं आपली श्रद्धा योग्य आणि सार्थक होते.'