

Lord Hanuman Favourite Bhagyank:
अंकशास्त्र (Numerology) ही एक प्राचीन विद्या आहे. ती संख्येवरुन मानवी जीवनाचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करते. १ ते ९ या प्रत्येक अंकाला एक विशिष्ट उर्जा असते. तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे यावरुन व्यक्तीचा स्वभाव, त्याचे करिअर आणि त्याच्या जीवनातील घटनावर परिणम होतो, असे अंकशास्त्र मानते. या शास्त्रानुसार देवी-देवतांचे संबंध विशिष्ट अंकांशी जोडलेले आहेत. जाणून घेवूया भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद लाभणारा भाग्यांकाविषयी....
कोणाला लाभतो हनुमानाचा विशेष आशीर्वाद
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला झाला असेल तर त्याचा भाग्यांक ९ असतो. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १८ तारखेला झाला असेल तर १ + ८ = ९ म्हणजेच त्यांची मूळ संख्या ९ असेल. त्याचप्रमाणे ९ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचाही भाग्यांक ९ असतो. ज्योतिषशास्त्रात ९ ही संख्या मंगळाची संख्या मानली जाते. नवव्या क्रमांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि मंगळाचे अधिष्ठाता भगवान हनुमान आहेत. म्हणूनच ९, १८ किंवा २७ तारखेला जन्म झालेल्या लोकांना हनुमानाचा विशेष आशीर्वाद मिळतो. आयुष्यात या लोकांना कितीही आव्हानांचा सामना करावा लागला तरी शेवटी ते नक्कीच यश मिळवतात.
भाग्यांक ९ असणार्या लोकांचे खास गुण
भाग्यांक ९ अंक असलेले लोक धाडसी, आत्मविश्वासू आणि कठाेर परिश्रम करणारे असतात. कठीण काळाही ते मोठ्या धैर्याने सामोरे जातात. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी ते सज्ज असतात. त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता असते. ज्या क्षेत्रात धैर्य आणि निर्णय घेण्याची शक्ती आवश्यक असते, अशा क्षेत्रात ते हमखास यश मिळवतात.
हनुमानाच्या कृपेने मिळवतात यश
९ भाग्यांकाचे लोक लोक सत्य आणि प्रामाणिकपणाने आपले काम करतात तर त्यांच्या आयुष्यात आर्थिक संकट जास्त काळ टिकत नाही. हनुमानाचे आशीर्वादामुळे जीवनातील अनेक अडचणींवर ते यशस्वीपणे मात करतात. कोणते संकट किंवा अडथळा आला तरी अत्यंत धैर्याने त्याला सामोरे जातात आणि पुन्हा उभे राहतात. या स्वभावामुळे संकटानंतर ते अधिक मजबूत होता.
हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हे काम करा
जर तुम्हीही ९ या अंकाने जन्माला आला असाल किंवा तुमच्या आयुष्यात हनुमानजींचे आशीर्वाद हवे असतील तर मंगळवारी नियमितपणे हनुमान चालीसा पाठ करा. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करा. मंगळवारी गरजूंची सेवा करा आणि तुमच्या वागण्यात सभ्यता ठेवा. तुमचा राग नियंत्रित करा आणि कोणाचीही टीका करणे टाळा. तुमचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला असेल हनुमानजींचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद आहे, याचे स्मरण नेहमी ठेवा.
सूचना : वरील माहिती तसेच दिलेले उपाय आणि विधी हे अंकशास्त्र, धार्मिक मान्यतेवर आधारित आहे.