

Numerology
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख केवळ एक आकडा नसून, त्यामध्ये भविष्यातील प्रगतीचे अनेक संकेत दडलेले असतात. जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून येणारा 'मूलांक' आपल्या स्वभावाचे आणि करिअरचे पैलू उलगडण्यास मदत करतो. अंकशास्त्राच्या विश्लेषणानुसार, तीन विशिष्ट मूलांक असे आहेत ज्यांच्या नशिबात करिअरची मोठी झेप असते. मात्र, काही स्वभावदोष किंवा चुकांमुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक '१' असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या ऊर्जेमुळे या व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासू आणि कष्टाळू असतात. त्यांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायला आवडते. आपले काम त्या गांभीर्याने घेतात.
ही चूक टाळा: मूलांक १ च्या व्यक्ती अनेकदा हट्टी स्वभावाच्या असतात. ते दुसऱ्यांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ करतात. जर त्यांनी सगळ्यांसोबत मिळून काम केले आणि इतरांचे ऐकून घेतले, तर त्यांना अपेक्षित यश लवकर मिळू शकते.
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ असतो. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. बुधाच्या प्रभावामुळे या व्यक्तींची बुद्धी अतिशय तल्लख असते. त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडते. कोणतेही बदल सकारात्मकतेने स्वीकारतात. मार्केटिंग, बिझनेस आणि संवाद क्षेत्राशी संबंधित करिअरमध्ये हे लोक चांगली प्रगती करतात.
ही चूक टाळा: या व्यक्तींची सर्वात मोठी कमतरता म्हणजे ते चंचल असतात. ते एका कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. संयम राखून आणि एकाग्रतेने काम केल्यास त्यांना करिअरमध्ये यश मिळेल.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाचा स्वामी 'शनी' आहे. या व्यक्ती कमालीच्या शिस्तप्रिय आणि मेहनती असतात. त्यांना यश थोडे उशिरा मिळते, पण जेव्हा मिळते तेव्हा ते अत्यंत समाधानकारक आणि शाश्वत असते. ध्येय गाठण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन मेहनत घेतात.
ही चूक टाळा: मूलांक ८ च्या व्यक्ती अनेकदा कामाचा अतिप्रेशर घेतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिक तणावात वाढ होते. कामात सुसूत्रता आणणे आणि वेळेनुसार विश्रांती घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. कामाचा समतोल राखल्यास त्यांची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते.