

Rashifal November 2025 : वैदिक पंचांगानुसार, नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रहांच्या वक्री आणि मार्गी स्थितीमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा मोठा प्रभाव दिसेल. या महिन्यात शनिदेव मार्गी होतील तर गुरू ग्रह वक्री होणार आहे. तसेच, शुक्र ग्रह आपली चाल बदलून २ नोव्हेंबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. ग्रहांचा राजा सूर्य १६ नोव्हेंबरला राशी परिवर्तन करेल आणि त्यानंतर बुध वृश्चिक राशीत उदय होईल. आता ५ ग्रह आपली चाल बदलणार असल्याने, काही राशींचे भाग्य चमकू शकते. या राशींच्या जातकांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. चला, जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी...
नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून शनिदेव सहाव्या स्थानी मार्गी होत आहेत. त्याचबरोबर, तुमच्या राशीच्या धनस्थानावर रूचक राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या जातकांना कोर्टाच्या प्रलंबित कामात यश मिळेल. अचानक धनलाभाचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कर्जाशी संबंधित अडचणी दूर होतील आणि तुमची मानसिक स्थिती सुधारेल. व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल. देश-विदेशात प्रवास करण्याचे योग आहेत.
मेष राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना अनुकूल सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून सप्तम भावात मालव्य राजयोग तयार होणार आहे, तर अष्टम स्थानी रूचक राजयोग बनेल. याशिवाय शनिदेव तुमच्या राशीतून १२व्या भावात मार्गी होतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन संवाद राहील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. करिअरमध्ये नवीन उंची मिळेल. नवीन प्रकल्पाबरोबच एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ, भेटवस्तू किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते.
नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीच्या कर्म भावात मालव्य राजयोग बनेल, तर शनिदेव तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात मार्गी होतील. त्यामुळे या काळात तुम्हाला काम-धंद्यात विशेष प्रगती मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये यश आणि लाभाची दाट शक्यता आहे. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. काम-व्यवसायात विस्तार होईल आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. या काळात तुमचे साहस आणि पराक्रम वाढेल. तसेच, भाऊ-बहिणींचे सहकार्य प्राप्त होईल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.