

Shani New Year Horoscope: ज्योतिषशास्त्रात शनी देवांना न्यायाची अन् कर्मफल देवता मानलं जातं. सध्या शनी ग्रह हा मीन राशीत असून त्यामुळं मेष, कुंभ आणि मीन राशी यांची साडेसाती सुरू आहे. आता २०२५ वर्ष संपण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत.
नव्या २०२६ वर्षात शनी मीन राशीत पुन्हा वक्री होणार आहे. त्यामुळं दोन राशींची शनी ढैय्या देखील सुरू होणार आहे. वर्ष २०२६ मध्ये शनी ढैय्या चा प्रभाव हा सिंह अन् धनू राशीच्या लोकांवर पडणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षात या दोन राशींच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र पुढच्या वर्षी शनी वक्री अन् मार्गी देखील होणार असल्यानं त्याचे काही फायदे देखील मिळतील. एकूण काय तर पुढचं वर्ष हे चढ उतारांचं राहणार आहे.
२०२६ मध्ये शनी ढैय्याचे सिंह राशीच्या लोकांवर मिश्र परिणाम असणार आहे. शनी हळू-हळू कामामध्ये स्थीरता घेऊन येईल.
नोकरीत जबाबदारी वाढेल आणि कामाचा दबाव देखील पहिल्यापेक्षा जास्त जाणवेल. प्रमोशन किंवा बदली प्रक्रियेत उशीर होण्याची शक्यात आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतर वर्षाच्या मध्यावर काही सकारात्मक बदल दिसतील. जुने अडकलेले प्रोजेक्ट पुढे सरकतील.
सिंह राशीच्या लोकांनी पुढच्या वर्षी पैशाच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अचानक खर्च वाढतील. मात्र कमाई देखील सुधारेल. कोणाला उधार देणे किंवा मोठी गुंतवणूक करणे सहसा टाळावे.
शनीची वक्री नजर नात्यात गैसरमज निर्माण करतील. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याच्या प्रकृतीसाठी मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्ष हे मानसिक तणावांनी भरलेलं वर्ष राहण्याची शक्यता आहे. झोप, डोकेदुखी, थकवा यासारख्या छोट्या मोठ्या समस्या जावणतील. आरोग्य जपण्यासाठी लाईफस्टाईल अन् खाण-पिणं संतुलित ठेवणे गरजेचे.
धनू राशीसाठी २०२६ हे वर्ष अनेक बदल घेऊन येणार आहे. जबाबदाऱ्या निभवणे, निर्णयावर टिकून राहणे आणि जीवनाकडे नव्या दृष्टीकोणातून कसं पाहायचं हे शिकवणारं राहणार आहे. वर्षाची सुरूवात आव्हानात्मक असली तरी शनी तुम्हाला आतून मजबूत बनवतील.
कामात शिस्त आणावी लागेल. ऑफिसमध्ये धैर्य आणि व्यवहारिक वृत्तीच तुम्हाला ओळख मिळवून देईल. २०२६ मध्ये काही मोठ्या संधी मिळतील. जबाबदारीनं काम करावं लागेल. नोकरी बदलण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
आर्थिक पातळीवर पुढील वर्षी चढ उतार राहणार आहे. पैसा विचार करून खर्च करा. जास्तीजास्त भर हा बचतीवर ठेवा. जुन्या देवाण-घेवाणीतून दिलासा मिळाले. मात्र खर्चावर नियंत्रण हवेच.
कुटुंबात तुमची भूमिका महत्वाची होईल, घरातील कोणत्यातरी सदस्याला तुमच्या मदतीची अन् भावनिक साथीची गरज लागणार आहे. प्रेम संबंधात थोडी कटुता येणार आहे. गोष्टी शांततेत सोडवा.
हाडे, गुडघा किंवा कंबर या संबंधी समस्या उद्भवू शकते. शनीच्या प्रभावामुळं थकवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळं २०२६ या वर्षात आरोग्याची विशेष काळजी घ्या.