

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : चपळ कृतीमुळे उत्तेजन मिळेल. यशासाठी वेळकाळ पाहून तुमच्या कल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल.
वृषभ : तुमचे व्यक्तिमत्त्व अत्तरासारखे काम करील. भविष्यात आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे, तर आजपासूनच बचत करा.
मिथुन : व्यावसायिक निर्णय घेताना दडपण घेऊ नका. प्रवासाच्या काही योजना असतील, तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.
कर्क : तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. नातेवाईकांची भेट होईल.
सिंह : एकाकी अवस्था संपून वातावरण उत्साही बनेल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या.
कन्या : गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल.
तूळ : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.
वृश्चिक : जमीन विषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती उत्तम आहे.
धनु : जर तुमची पैशा संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत अडकलेली असेल, तर आज त्यात विजय मिळू शकतो. धन लाभ ही होऊ शकतो.
मकर : अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल.
कुंभ : गरजेची कामे करणे विसराल. आज जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे सगळे कष्ट विसरून जाल.
मीन : स्वप्ने प्रत्यक्षात येतील. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात शक्य होईल. कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढतील.