New Year Horoscope 2026: शुक्र-मंगळ अभद्र युती.. प्रेम, नातेसंबंधात तणाव! ६ जानेवारीपासून 'या' राशींच्या लोकांनी रहावे सावध

ज्योतिष तज्ञांच्या मते ज्यावेळी ग्रहात युद्धासारखी स्थिती निर्माण होते त्यावेळी त्याचा जास्त प्रभाव हा हे ग्रह ज्या राशींवर राज्य करतात त्या राशीच्या लोकांवर पडतो.
 Horoscope
Horoscope pudhari photo
Published on
Updated on

New Year Horoscope 2026: द्रिक पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरूवात झाल्या झाल्या जानेवारी महिन्यात शुक्र अन् मंगळ ग्रह हे एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. ज्यातिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांचा स्वभाव हा एकमेकांच्या अगदी विरूद्ध मानला जात आहे. त्यामुळं ज्यावेळी शुक्र अन् मंगळ ग्रह एवढ्या जवळ आल्यावर ही स्थिती युद्धाची स्थिती म्हणून मानली जाते.

पंचांगानुसार ही अभद्र युती ६ जानेवारीला सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी सुरू होणार आहे. ही स्थिती चार दिवस तशीच राहील. त्यानंतर १० जानेवारीला सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी ही स्थिती संपुष्टात येईल. ज्योतिष तज्ञांच्या मते ज्यावेळी ग्रहात युद्धासारखी स्थिती निर्माण होते त्यावेळी त्याचा जास्त प्रभाव हा हे ग्रह ज्या राशींवर राज्य करतात त्या राशीच्या लोकांवर पडतो. त्यामुळे शुक्र-मंगळ ग्रहयुद्धाच्या स्थितीत ४ राशीच्या लोकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देतात.

 Horoscope
Horoscope 31 December 2025: वर्षाचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; वाचा आजचे राशिभविष्य

१ मेष

मेष राशीचा मुख्य ग्रह हा मंगळ आहे. त्यामुळे या शुक्र-मंगळ अभद्र युतीचा सर्वात जास्त प्रभाव हा मेष राशीच्या लोकांवर पडणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना लवकर राग येण्याची शक्यता आहे. ते विचार न करता निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामकाजात घाई नुकसानदायक ठरू शकते. नात्यात देखील संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. मेष राशीच्या लोकांनी या चार दिवसाच्या काळात संयम ठेवणं गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते.

 Horoscope
Weekly Horoscope: या आठवड्यात ५ राशींचे नशीब पालटणार; तुमची आर्थिक स्थिती कशी असेल?

२ वृषभ

शुक्र- मंगळ ग्रहांच्या या स्थितीचा वृषभ राशीच्या लोकांवर देखील प्रभाव पडेल. प्रेम, कौटुंबीक नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नये. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. या काळात धैर्यानं काम करा. भावनांवर नियंत्रण ठेवा याचा फायदा होईल.

 Horoscope
New Year 2026 Rashi bhavishya: मोठ्या खगोलीय घटनांची सुरूवात... या 5 राशींसाठी नवीन वर्ष असणार लकी!

३ तुळ

शुक्र-मंगळ ग्रहांची ही युती तुळ राशीच्या लोकांना द्विधा मनःस्थिती जाणवू शकते. नात्यात गैरसमज होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद आणि संघर्षाची स्थिती निर्माण होऊ देऊ नये. या काळात तुम्हाला संतुलन राखायचं आहे. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे.

 Horoscope
Rashi Bhavishya 2025 | 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ काळ, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

४ वृश्चिक

६ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान वृश्चिक राशीच्या लोकांची चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. कामात बाधा येण्याची शक्यता आहे. पाहिजे तशा गोष्टी होणार नाहीत. निराशा होऊ शकते. वैवाहिक जीवनात देखील तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात शांत राहून निर्णय घ्या. या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news