

Weekly Horoscope
हा सप्ताह कर्क, तुळ, कुंभ, मीन राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. 29- बुध धनूत 7/24. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. 30-बुध केंद्र शनी, वक्री ग्रह- गुरू, हर्षल. अस्तंगत ग्रह : शुक्र.
रवी मं. शु. बु. 9 वे. भाग्य बलवान राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामासाठी प्रवास घडेल. भावंडे तुमच्या भाग्यात वाटेकरी होतील. अनाकलनीय खर्च उद्भवतील. भाग्यात अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. भावंडांची भेट होईल.
रवी मं.शु.बु. 8 वे. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. आर्थिक प्राप्ती होईल. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल.अपघात होणार नाही, याची काळजी घ्या. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक -दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
रवी मं.शु.बु.7 वे. भावनिक दडपण राहील. कामासाठी प्रवास घडेल. कौटुंबिक खर्च वाढेल. नोकरीत अधिक जबाबदारीची कामे करावी लागतील. परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला जबाबदारीने कामे करून यश मिळवाल. आर्धिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. शेवटी मनोबल वाढेल.
रवी मं.शु.बु. 6 वे. आव्हानात्मक कामे कराल. त्यात यश मिळेल. विसरभोळेपणामुळे नुकसान. सरकारी संकटांचा अंदाज घ्या. कायदेशीर बाबी सांभाळा. परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील.
रवी मं.शु.बु. 5 वे. मनाची कुचंबणा होईल. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करा. कला क्षेत्राकडे जास्त ओढा राहील. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, शारीरिक व्याधी जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. मित्रामुळे अडचणीत येऊ शकाल.
रवी मं.शु.बु.4 थे. घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. आर्थिक प्राप्ती होईल. पोटाची तक्रार राहील. धाडसी कामाचे कौतुक होईल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्याल. सप्ताहाच्या सुरुवातीला यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सहजीवन लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे,?थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामाचे समाधान लाभेल.
रवी मं.शु.बु.3 रे. नवीन कामे करण्याची धमक राहील. सुवर्णालंकारांचा लाभ होईल. चांगल्या आधिकाराची नोकरी मिळेल. विवाह जुळेल. गुरुकृपा राहील. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
रवि मं.शु.बु.2 रे आर्थिक प्राप्ती जेमतेम, चांगली पण कष्टाने होईल. घरगृहस्थीत मतभेद राहतील. भावनिक दडपण राहील. शारिरीक व्याधीकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या सुरूवातीला शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. दुर्लक्ष झाल्यास काम बिघडू शकेल. नंतर मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. शेवटी प्रकृती नरमगरम राहील.
रवि मं.शु.बु.1ले तडफदारपणा राहील. पण भावनावेग आवरा बोलून इतरांना दुखवू नका. आर्थिक प्राप्ती होईल. पुरस्कार मिळतील. पोटाची तक्रार राहील. मानसिक संतुलन राखा. सप्ताहाच्या सुरूवातीला घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. संततीचा सहवास लाभेल. दुर्लक्ष झाल्यास काम बिघडेल. मनोबल वाढेल. कामात यश मिळेल. विवाह जुळेल. थकवा जाणवेल.
रवी मं.शु.बु. 12 वे. अनेक प्रकारचे खर्च उद्भवतील. राजकीय संकटांचाही अंदाज घ्या. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कुटुंबात अशांतता अनुभवाल. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कर्तृत्व सिद्ध कराल गाठीभेटी घ्याल. प्रवास कराल. थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. गाफील राहिलात, तर नुकसान संभवते. शेवटी मनोबल वाढेल.
रवी मं.शु. बु. 11 वे. अनेक मार्गांनी लाभ होतील. गुरुकृपा राहील. प्रॉपर्टीची कामे होतील. विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. कामासाठी प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. एक-दोन दिवस खूप धावपळ करून कामात यश मिळेल. थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.
रवी मं.शु.बु. 10 वे. कार्यक्षेत्र वाढेल. कामाच्या ठिकाणी मोठ्या उलाढाली होतील. नोकरीत बदलीची शक्यता राहील. निर्णायक कामात यश मिळेल. घरात पुढाकार घेऊन कामे कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला अभ्यास करून कामे यशस्वी कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळवाल. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल. हाऊसकिपिंगकडे लक्ष द्याल.