पुढारी वृत्तसेवा
आपट्याची पाने सोने म्हणून वापरण्याची दसऱ्याची प्रथा पारंपरिक आहे. सध्या या पानांचा उपयोग विडी वळण्यासाठी केला जातो.
या पानांचा अंगरस निघत नाही, तर पाणी घालून रस काढून औषधांत वापरावा लागतो. याची शेंग बाळगुटीमध्ये उगाळून देतात.
अतिसार व आव: पानांचा रस मिरपुडीसह किंवा कांद्याच्या रसात मिसळून द्यावा.
मुरडा: दहा ग्रॅम सुकी फुले साखरेबरोबर चावून खावीत.
जंतावर: मुळाच्या सालीचा काढा करून देतात.
सूज व जखम: मुळाची साल ठेचून त्याचा लगदा जखमेवर किंवा सुजेवर बांधावा.
सूज: पानांचा रस २० ग्रॅम, गाईचे दूध व खडीसाखर घालून जास्तीत जास्त चार वेळा द्यावा.
यकृतास आलेली सूज: मुळाची साल दहा ग्रॅम दोन पेले पाण्यात उकळवून अर्धे पाणी राहेपर्यंत आटवून गाळून घ्यावे.
विंचूदंश: झाडावरील दोन पाने देठाच्या बाजूने धरून खुडावीत व दंशस्थानावरून खाली फिरवत राहावे.