August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे जबरदस्त परिवर्तन; या ४ राशीची लोकं वर्षभर राहणार तुपाशी

August Grah Gochar
August Grah Gocharpudhari
Published on
Updated on

August Grah Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार २०२६ च्या ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे असं जबरदस्त परिवर्तन होणार आहे. हे ग्रहांचे परिवर्तन खूप महत्वाचे आहे. या महिन्याच्या सुरूवातीला अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वांसह १२ राशींवर देखील होणार आहे. ग्रहांच्या या परिवर्तनामुळं काही शुभ योग निर्माण होणार आहे. त्याचा फायदा काही खास राशींना होणार आहे.

August Grah Gochar
Budh Gochar 2026 : ८ दिवसांनंतर 'या' ५ राशींचे नशीब उजळणार; बुध गोचर ठरणार विशेष लाभदायक!

ऑगस्ट महिन्यातील खास ज्योतिषीय योग

त्रिग्रही योग

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला जवळपास ५ ऑगस्टच्या दरम्यान, कर्क राशीत सूर्य, बुध आणि गुरू हे एकत्र येणार आहेत. त्यामुळे शक्तीशाली असा त्रिग्रही योग निर्माण होणार आहे.

हंस राजयोग

गुरू कर्क राशीत उच्च स्थानावर विराजमान होणार असून यामुळे राजयोग निर्माण होत आहे. याचा प्रभाव पूर्ण महिनाभर असणार आहे.

August Grah Gochar
Shukra Gochar : शुक्र ग्रह करणार बुधाच्‍या राशीत प्रवेश; ५ दिवसांनंतर 'या' ५ राशींचा बँक बॅलन्स वाढणार!

बुधादित्य योग

२२ ऑगस्ट रोजी बुध हा सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्य आणि बुध यांच्याशी युती होणार आहे. त्यामुळं बुद्ध आणि नेतृत्व क्षमता विकास होईल.

सूर्य केतू युती

१७ ऑगस्ट रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार असून सूर्य आणि केतू यांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ आव्हानात्मक मानला जातो.

August Grah Gochar
Mangal Gochar 2026: ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मोठा फेरबदल! 'ग्रहांचा सेनापती' बदलणार या ४ राशींचं नशीब

कोणत्या राशीं आहेत तुपाशी

मेष राशी - मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात नवीन आशा आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे अनेक दिवसांपासून अडकून असलेली कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीला प्रमोशन आणि नवीन जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक लाभ आणि उत्पन्नाची नवीन स्त्रोत निर्माण होतील.

सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना जबरदस्त आणि भाग्यकारी ठरणार आहे. या महिन्यात सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळं तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता यात वाढ होणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची स्तुती केली जाईळ. तुमच्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार होईल. जमीन, वाहन खरेदीची योजना यशस्वी होऊ शकते.

August Grah Gochar
Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता; आज तुमची रास काय सांगते?

तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना दिलासादायक असणार आहे. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अडचणीतून तुमची मुक्तता होणार आहे. तुमची कामे ठरलेल्या वेळात पूर्ण होतील. व्यवसायांना नवीन करारांमुळे चांगला फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाची स्थिती असणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध जास्तच दृढ होतील.

मकर राशी - मकर राशीच्या लोकांना या महिन्यात सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रमोशन आणि नवीन मार्ग खुले होतील. त्यामुळं तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार किंवा आहे त्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नाफा मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news