

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात शिस्त व संयम ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा. खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवास लाभदायक ठरू शकतो.
मिथुन : नवीन कल्पना अमलात आणण्यासाठी दिवस अनुकूल आहे. जबाबदाऱ्या वाढतील. बोलताना विचारपूर्वक शब्द वापरा.
कर्क : चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या निर्णयासाठी योग्य दिवस. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह : खर्च वाढण्याची शक्यता, नियोजन आवश्यक. कामात विलंब होऊ शकतो. आध्यात्मिक किंवा ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
कन्या : मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. नियोजनबद्ध कामाने यश मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या.
तूळ : कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. जबाबदाऱ्या वाढतील, पण आत्मविश्वासाने पार पाडाल.
वृश्चिक : भाग्याची साथ मिळेल. धार्मिक किंवा शुभकार्यात सहभाग होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
धनु : अचानक खर्च किंवा अडचणी येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय आज टाळलेले बरे. आरोग्याची काळजी घ्या. संयम ठेवा.
मकर : भागीदारीतील कामांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता.
कुंभ : कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मतभेद टाळा. संयमाने काम केल्यास दिवस सुरळीत जाईल.
मीन : सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस. आनंददायी बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल. मुलांकडून समाधान मिळेल.