Diwali 2025 Laxmipujan: लक्ष्मीपूजन यंदा २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? जाणून घ्या तारीख आणि वेळ

lakshmi pujan 2025 marathi: प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करण्याचे शास्त्र सांगते. त्याचे विशिष्ट नियम शास्त्रीय ग्रंथात दिले आहेत.
Diwali 2025 Laxmipujan: लक्ष्मीपूजन यंदा २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? जाणून घ्या तारीख आणि वेळ
Published on
Updated on

Diwali 2025 Laxmipujan Date Panchang

मुंबई : दिवाळी... आयुष्यात आनंदाच्या नवपर्वाचा, दिव्यांचा आणि समृद्धीचा सण! प्रत्येक घरात मंगलमय पहाटे घेऊन येणाऱ्या या सणात केले जाणारे लक्ष्मीपूजन हे सुख, समृद्धीसह सर्वांच्या जीवनात नवतेजोमयतेचा अनुभव देणारा ठरतो. यावर्षीही मागील वर्षाप्रमाणेच दिवाळीचे लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करायचे? याबाबत जनमानसात संभ्रमाची स्थिती आहे. जाणून घेवूया, यंदा लक्ष्मीपूजन २० ऑक्टोबर रोजी आहे की २१ ऑक्टोबरला? याविषयी...

लक्ष्मीपूजनासंदर्भात शास्त्रीय ग्रंथात विशिष्ट नियम

दिवाळी सण आणि लक्ष्‍मी पूजन हे एकमेकांशी अत्यंत निगडीत असलेले घटक आहेत. आपल्‍या संस्‍कृती आणि परंपरेमध्‍ये हा केवळ एक धार्मिक विधी नसून, जीवनात समृद्धीच्या प्रतिमांचा आकलन करणारा एक अद्वितीय अनुभव आहे. प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करण्याचे शास्त्र सांगते. त्याचे विशिष्ट नियम शास्त्रीय ग्रंथात दिले आहेत. स्थानिक सूर्यास्‍तापासून पुढील अडीच तासांचा कालावधी प्रदोष काळ मानला जातो.

Diwali 2025 Laxmipujan: लक्ष्मीपूजन यंदा २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? जाणून घ्या तारीख आणि वेळ
Unique Diwali Gift Ideas | पत्नीसाठी पहिल्या दिवाळीच्या खास भेटवस्तू; साडी-दागिन्यांपेक्षा 'हे' युनिक गिफ्ट वाढवेल नात्यातील गोडवा!

महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला?

यंदा महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत ठरणार आहे. तर, देशातील बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे.

Diwali 2025 Laxmipujan: लक्ष्मीपूजन यंदा २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? जाणून घ्या तारीख आणि वेळ
Pune Diwali Fire Crackers: पुण्यात रात्री 10 नंतर फटाके वाजवण्यास बंदी, 'अ‍ॅटमबॉम्ब' बाळगण्यावरही निर्बंध

इतर देशांमध्ये लक्ष्मीपूजन केव्‍हा ?

मध्य आणि पूर्व युरोपाबद्दल विचार केला तर, दुबई, अबूधाबी आणि युरोप, संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन करणे अपेक्षित आहे. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या देशांमध्ये २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन करणे अपेक्षित आहे. हे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) मध्ये नमूद केले आहे.

Diwali 2025 Laxmipujan: लक्ष्मीपूजन यंदा २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? जाणून घ्या तारीख आणि वेळ
Rajasthani terracotta diyas Diwali Pimpri market: राजस्थानी टेराकोटा दिव्यांची बाजारात छाप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news