Kamika Ekadashi 2026: हिंदू धर्मात कामिका एकादशीला एवढं का असंत महत्व? यंदा तर द्विपुष्कर योग जुळून येणार आहे

Kamika Ekadashi
Kamika Ekadashi pudhari
Published on
Updated on

Kamika Ekadashi 2026: श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला फक्त भगवान विष्णूच नाही तर भगवान शिव यांची देखील कृपादृष्टी असते अशी मान्यता आहे. ब्रम्हवैतर्व पुराणानुसार या एकादशीला उपवास केल्याने आणि विधिवत पुजा केल्याने भाविकाला अश्वमेध आणि वाजपेय यज्ञाच्या समान पुण्य लाभतं. या वर्षी कामिका एकादशीला दुर्मीळ असा द्विपुष्कर योग जुळून येत आहे. हा योग पूजा आणि आध्यात्मिक साधना करण्यासाठी अत्यंत शुभ आहे.

Kamika Ekadashi
Rashi Bhavishya Today: आजची एक लहानशी संधी बदलणार या राशीचं भविष्य! पाहा, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

कामिका एकादशी २०२६

पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षाची एकादशी ८ ऑगस्ट २०२६ रात्री १ वाजून ५९ वाजता सुरू होणार आहे. ही एकादशी ९ ऑगस्ट २०२६ रोजी सताळी ११०४ वाजता संपणार आहे. उदया तिथीच्या मान्यतेनुसार कामिका एकादशीचा उपवास हा ९ ऑगस्ट रोजी रविवारी करण्यात येणार आहे.

Kamika Ekadashi
Mangal Gochar 2026 : आज शनीच्या क्रूर दृष्टीतून मुक्त होणार मंगळ, ‘या’ 3 राशींवरील संकट टळणार

९ ऑगस्ट २०२६ पूजा करण्याची योग्य वेळ

ब्रह्म मुहूर्त - सकाळी ४.२ पासून ४.४५ वाजेपर्यंत

अमृत काल - सकाळी ६.४२ पासून ८.९ वाजेपर्यंत

अभिजीत मुहूर्त - दुपारी ११.३७ पासून १२.३० पर्यंत

विजय मुहूर्त - दुपारी २.१५ पासून दुपारी ३.७ वाजेपर्यंत

गोधूलि मुहूर्त - सायंकाळी ६.३८ पासून ७ वाजेपर्यंत

Kamika Ekadashi
August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे जबरदस्त परिवर्तन; या ४ राशीची लोकं वर्षभर राहणार तुपाशी

एकादशीला उपवास सोडण्याची वेळ ही द्वादशी तिथीला आहे. २०२६ मध्ये उपवास सोडण्याची वेळ ही १० ऑगस्ट सकाळी .५.५० पासून सकाळी ८ वाजेपर्यंत आहे.

काय काळजी घ्यायची

उपवास सोडताना भात, हरभरा डाल, मसूर डाळ किंवा वांग्याचं सेवन करू नये. सात्विक भोजन घ्या. उपवासाच्या एक दिवस आधी दशमीच्या सायंकाळी सात्विख भोजन ग्रहण करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news