आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |मंगळवार, २३ जुलै २०२४

आजचे राशिभविष्य : मंगळवार, २३ जुलै २०२४
Horoscope Today
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मंगळवार, २३ जुलै २०२४File Photo

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : नातेवाईकांशी संबंध दृढ होतील

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : ग्रह स्‍थिती अनुकूल आणि तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. भविष्यातील महत्त्वाच्या योजनाही आखाल. मालमत्ता किंवा वारसा संबंधित कामांमध्ये गडबड झाल्यामुळे तणाव येऊ शकतो. भावांसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. मुलांना त्‍याच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी मदत करा. तुमची कार्यशैली आणि योजना व्यवसायाला चालना देऊ शकतात.

वृषभ : पती-पत्नीचे नाते मधूर होईल

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : आज राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल. राजकीय संपर्कही तुम्हाला काही चांगल्या संधी देईल. नवीन वाहन खरेदीबाबत नियोजन होईल. उधार दिलेले पैसे परत मिळवून आर्थिक समस्या सोडविण्‍यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत मनोरंजन वेळ वाया घालविण्‍यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

मिथुन : मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा प्रवाह जाणवेल. कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकेल. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : विरोधकही तुमच्याविरोधात षड्‍यंत्र रचतील

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : आज काही महत्त्वाच्या आणि उच्चपदस्थ व्यक्तींचे मार्गदर्शन नवीन यश मिळवून देईल. विरोधकही तुमच्याविरोधात षड्‍यंत्र रचतील. त्‍यामुळे कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी संबंधित योजनांचा पुनर्विचार करा. एक छोटीशी चूकही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. व्यवसायात केलेली बदलाची धोरणे लवकरात लवकर अंमलात आणा. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या समस्या चर्चेतून सोडवता येतील.

सिंह : वास्तू नियमांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : आज घरातील बदल किंवा नूतनीकरणाबाबत विचार कराल. मात्र वास्तू नियमांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू हरवल्याने किंवा विसरल्याने घरात तणावाचे वातावरण राहील. मालमत्तेवरुन जवळच्या नातेवाईक किंवा भावाशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

कन्या : रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्‍याची गरज

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : मालमत्तेसंबंधित एखादे न्यायालयीन प्रकरणावर तोडगा निघाल्‍याने मानसिक तणावातून आराम मिळेल. नातेवाईकांसोबत वादग्रस्त बाबीबत हस्‍तक्षेप करण्‍यापूर्वी सावधगिरी बाळगा, छोट्या चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आज ही कामे टाळली तर बरे होईल. आपल्या योजना कोणासमोरही उघड करू नका; कोणीतरी त्याचा फायदा घेऊ शकतो. घरातील वातावरण आनंददायी राहिल. खाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोटविकाराचा त्रास होवू शकतो.

तूळ : पती-पत्नीच्या नात्यात सौहार्द राहील

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्‍या. घरातील कामे पूर्ण करण्‍यास प्राधान्‍य द्‍याल. तुमच्या निष्काळजीपणामुळे नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात लाभदायक यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात सौहार्द राहील.

वृश्चिक : वाहन खरेदीचा विचार सध्‍या टाळा

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : धार्मिक संस्थेच्‍या कार्यात सहभागी झाल्‍याने मनःशांती लाभेल. आज तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्‍यास यश मिळेल. वाहन खरेदीचा विचार सध्‍या टाळा. आर्थिक बाबी सध्या सामान्य राहतील. अनावश्यक खर्चात कपात करा. व्यवसायात आज जास्त मेहनत करावी लागेल. पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य लाभेल. ऍलर्जीशी संबंधित त्रास संभवतो.

धनु : धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्यतीत होईल

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्यतीत होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा गांभीर्याने विचार करा. कोणत्याही प्रकारच्‍या कागदपत्रावर करताना सावधगिरी बाळगा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

मकर : मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : आज तुम्हाला एखाद्या गरजू मित्राची मदत कराल. मुलांना अभ्यास केलेल्‍या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घेवूनच निर्णय घ्‍या. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. व्यापार क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कुंभ : व्यवसायात नवीन काम करण्यास योग्य वेळ

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास कायम राहिल. सामाजिकदृष्ट्याही तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक समस्यांमुळे चिंतीत राहाल. ही समस्या काही काळ राहील त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल योग्य वेळ आहे.

मीन : टुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल घडू शकतात

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : आज दैनंदिन व्यवहारात काही बदल करण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ व्‍यतित करा. कौटुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक व्‍यवहार काळजीपूर्वक करा. अन्‍यथा तुमचे पैसे अडकतील. मुलाखतीत आलेल्‍या अपयशाने तरुणासाठी निराशाजनक असेल. व्यवसायाशी संबंधित काम किंवा आर्थिक व्‍यवहार करताना कागदपत्रे योग्‍य ठेवा. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news