Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, २६ ऑगस्‍ट २०२४

जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Today
जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : प्रलंबित आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज प्रलंबित आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. मनात समाधानाची भावना राहील. आता भविष्‍याचा वेध घेण्‍याची वेळ आली आहे. संशयास्पद स्‍वभावामुळे नातेसंबंध खराब होऊ शकतात. विचारात लवचिक असणे महत्वाचे आहे. कोणत्‍याही गोष्टींनी भारावून जाऊ नका. मुलांना त्‍यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मदत करा. सध्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही समस्येत तुमच्‍या जोडीदाराचा सल्ला घ्या; नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.

वृषभ : दुपारनंतर परिस्थिती अनुकूल राहील

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : आज दुपारनंतर परिस्थिती अनुकूल राहील. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमचा वेळ चांगला जाईल. ऊर्जा आणि आनंद राहील. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. व्यवसायातील अडचणी सोडविण्‍यासाठी ज्येष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक.

मिथुन : आज कोणतीही नवीन योजना सुरू करू नका

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. कौटुंबिक वाद किंवा मतभेद सोडविण्‍यासाठी हीच योग्य वेळ आहे. जवळच्या व्यक्तीकडून काही अप्रिय बातम्या मिळणे निराशाजनक असू शकते. या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज कोणतीही नवीन योजना सुरू करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ फारसा सोयीचा नाही. कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण होईल.

कर्क : पैसे उधार घेऊ नका

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : आज जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमचा उत्साह वाढेल. मनोरंजक क्रियाकलापांमध्ये वेळ घालवणे तुम्हाला आनंदित करू शकते. मदतीसाठी इतरांवर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कार्यक्षमतेवर अवलंबून रहा. घरातील ज्येष्ठांचा आदर राखा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. पैसे उधार घेऊ नका. घरातील वातावरण शांत राहू शकते.

सिंह : गुंतवणूक करण्यापूर्वी नीट तपासूनच निर्णय घ्‍या

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : आजचा दिवस सामान्य असेल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. वडिलधाऱ्यांच्या मदतीने वादग्रस्त मालमत्तेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट तपासूनच निर्णय घ्‍या. कोणाशीही वाद घालू नका. सध्या कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे अनुकूल नाही

कन्या : व्यवसायातील सध्याची कामे थोडी मंद असतील

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज बहुतांश कामे व्यवस्थित पार पडल्‍याने मनाला समाधान मिळेल. कौटुंबिक सुख-सुविधांच्या खरेदीवर खर्च जास्त होईल. आर्थिक व्यवहार किंवा कर्ज घेण्यापासून लांब राहा. एखाद्याशी संवाद साधताना कठोर शब्‍दांचा वापर करु नका. व्यवसायातील सध्याची कामे थोडी मंद असतील.

.

तूळ : धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने मनःशांती मिळेल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : संयम आणि चिकाटी तुम्हाला तुमची दिनचर्या व्यवस्थित करण्यात मदत करेल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने मनःशांती मिळेल. आळस टाळून कार्यपूर्तीस प्राधान्‍य द्‍या. तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. निर्णय घेताना व्‍दिधा मनस्‍थिती होत असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सध्याच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबतही थोडा वेळ व्‍यतित करा. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक : मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात यश मिळेल

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्‍याने तुमची महत्वाकांक्षा पूर्ण होण्‍यास मदत होईल. रखडलेल्‍या सरकारी कामांकडे लक्ष द्या. भावनिक होऊन तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता, त्यामुळे तुमचे विचार व्यावहारिक ठेवा. मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. पती-पत्‍नीमध्‍ये नाते मधूर होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकल्‍यासारखं वाटेल.

धनु : आज तुम्‍हाला मनाप्रमाणे यश मिळेल

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍हाला मनाप्रमाणे यश मिळल्‍याने मन उत्साहही राहील. तणाव दूर झाल्‍याने महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील. सध्याच्या वातावरणामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आळस आणि निष्काळजीपणा टाळा. दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका. दिवसभर व्यस्त असूनही कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल.

.

मकर : तुमच्या हट्टीपणामुळे नात्यातील दुरावा वाढू शकतो

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : श्रीगणेश सांगतात की, आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्याचा सल्ला तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतो. घराच्या देखभालीसाठी किंवा सुधारणेसाठी काही योजना असल्यास योग्य वेळ आहे. वाहन किंवा घराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करण्याचे नियोजन टाळणे चांगले राहील. यावेळी अचानक मोठा खर्च होऊ शकतो. तुमच्या हट्टीपणामुळे नात्यातील दुरावा वाढू शकतो.

कुंभ : आर्थिक बाबतीत कोणताही महत्त्‍वाचा निर्णय घेवू नका

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा स्वीकार करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी योग्य वेळ. मत्सरी लोकांपासून सावध रहा. इतरांचा सल्ला चुकीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त काम होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणताही महत्त्‍वाचा निर्णय घेवू नका.

मीन : आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. तुमच्या मागील चुकांमधून शिका. तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. चुकीच्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. बाहेरील कोणीतरी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकेल. तुमच्या बांधवांसोबत चांगले संबंध राखण्यासाठी तुमचे योगदान असेल. व्यवसायाशी संबंधित अधिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news