Holashtak 2026: सावधान! होलाष्टकावर जुळून येतोय भयंकर 'पंचग्रही योग'; पुढील काही दिवस 'या' २ राशींसाठी धोक्याचे

Holi 2026 Astrology: फेब्रुवारीच्या शेवटी ग्रहांची स्थिती एक खास योग तयार करत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळेल.
Holashtak 2026 Holi Astrology
Holashtak 2026 Holi Astrology file photo
Published on
Updated on

Holashtak 2026 Holi Astrology

नवी दिल्ली: फेब्रुवारीच्या शेवटी ग्रहांची स्थिती एक खास योग तयार करत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळेल. पंचांगानुसार, २३ फेब्रुवारीला म्हणजेच काल मंगळ ग्रह मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश कर्ता झाला आहे. कुंभ राशीत आधीच सूर्य, बुध, शुक्र आणि राहू उपस्थित आहेत, अशा परिस्थितीत मंगळाच्या आगमनामुळे पाच ग्रह एकत्र आले असून 'पंचग्रही योग' निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा योगायोग आज होलाष्टकावर जुळून येत आहे, त्यामुळे होळीपर्यंतचा काळ काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. मात्र, होळीनंतर परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत.

Holashtak 2026 Holi Astrology
Predictions: कोरोना...लॉकडाऊन...जागतिक मंदी...; २०२९ मध्ये पुन्हा २०२० ची पुनरावृत्ती? ग्रहांची स्थिती देतेय महासंकटाचे संकेत!

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक ताण वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धा आणि विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे महागात पडू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर घाई करू नका. नोकरीशी संबंधित कोणताही मोठा निर्णय होळीनंतरच घ्या. प्रवासादरम्यान आपल्या सामानाची विशेष काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत पोट आणि हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात भगवान शंकराची पूजा करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो, जसे की फूड पॉइजनिंग किंवा बीपीशी संबंधित समस्या. अपुऱ्या झोपेमुळेही त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना नुकसान किंवा खर्च वाढल्यामुळे तणाव जाणवू शकतो. या काळात घाईघाईत गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा तुमच्या नात्यांवर आणि मान-सन्मानावर परिणाम होऊ शकतो. सध्या कोणालाही उधार देणे किंवा घेणे टाळलेलेच बरे. उपाय म्हणून गाईची सेवा करणे आणि तिला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ मानले गेले आहे.

होलाष्टक म्हणजे काय?

होळीच्या आधीचे आठ दिवस म्हणजे होलाष्टक होय. २४ फेब्रुवारी, मंगळवारपासून हा काळ सुरू होत आहे, ज्याला हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रानुसार, या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

Holashtak 2026 Holi Astrology
बेडरूमची 'ही' दिशा पती-पत्नीमध्ये वाढवू शकते तणाव; त्वरित बदल करा, अन्यथा वाढेल मानसिक ताण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news