Guru Gochar 2026 : ऑगस्ट ते ऑक्टोबर काळात कन्या, तुळसह या ४ राशींना मिळणार दिलासा

Guru Gochar 2026 : १९ ऑगस्ट रोजी गुरू ग्रह अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल
Guru Gochar 2026
Guru Gochar 2026file photo
Published on
Updated on

Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ऑगस्ट महिना अनेक राशींच्या आयुष्यात मोठा दिलासा घेऊन येत आहे. आजपासून २९ दिवसांनंतर, म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी गुरू अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. अश्लेषा हे बुध ग्रहाचे नक्षत्र मानले जाते. त्यामुळे या नक्षत्र परिवर्तनाचा थेट फायदा कन्या आणि तुळेसह एकूण ४ राशींना होणार आहे. चार राशींना गुरू आणि बुध या दोन्ही ग्रहांची विशेष कृपा लाभणार आहे.

गुरूच्या अश्लेषा नक्षत्र प्रवेशाचे शुभ परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धी, संवाद, शिक्षण आणि व्यापाराचा कारक मानला जातो; तर गुरू हा ज्ञान, समृद्धी, प्रगती आणि संबंधांचा कारक आहे. जेव्हा गुरू ग्रहाचा बुध नक्षत्रात प्रवेश होतो, तेव्हा लोकांची बौद्धिक क्षमता आणि निर्णयक्षमता वाढते. नवीन संकल्पना सुचतात आणि योग्य वेळी अचूक निर्णय घेणे सोपे जाते. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा तर होतेच, शिवाय नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीतही मोठा फायदा होतो.

मिथुन राशीच्या जातकांची प्रलंबित कामे लागतील मार्गी

१९ ऑगस्टपासून मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे. बऱ्याच दिवसांपासून अडून राहिलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत असलेल्यांना नवी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यापाऱ्यांना नव्या लाभदायक डील्स मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Guru Gochar 2026
Budh Gochar 2026 : पुढील ३२ दिवस ४ राशींवर होणार पैशांचा पाऊस! बुध गोचर बदलणार नशीब; तुमची रास आहे का?

कन्या राशीच्या जातकांना मिळेल मेहनतीचे फळ

गुरू-बुधाच्या या युतीचा मोठा फायदा कन्या राशीलाही मिळेल. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल आणि कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येईल. व्यवसायात चांगला नफा होईल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील.

तूळ राशीच्या जातकांची आर्थिक अडचण होईल कमी

तूळ राशीचे लोक दीर्घकाळानंतर मोकळा श्वास घेतील. आर्थिक चणचण आणि अडचणी हळूहळू दूर होतील. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील, ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर दिसून येईल.

Guru Gochar 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

मकर राशीच्या जातकांवरील ताणतणाव होईल कमी

गुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मकर राशीच्या लोकांवरील ताणतणाव कमी होईल. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल आणि व्यवसायात आर्थिक फायदा होईल. अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय वेळेवर आणि अचूक घेऊ शकाल.

टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्‍मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news