Garuda Purana: महिलांनी स्मशानभूमीत का जाऊ नये? गरुड पुराणात सांगितली आहेत 'ही' कारणे

Why women are not allowed in Shmashan Ghat?: स्त्रियांचे स्मशानभूमीत जाणे सामान्यतः वर्ज्य मानले जाते. यामागे नक्की कोणती धार्मिक कारणे आहेत आणि गरुड पुराणात काय सांगितलं आहे?
Why women are not allowed in Shmashan Ghat?
Why women are not allowed in Shmashan Ghat?file photo
Published on
Updated on

Why women are not allowed in Shmashan Ghat?

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर पंचतत्वात विलीन करण्यासाठी अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जातो. भारतीय परंपरेनुसार, या प्रक्रियेत प्रामुख्याने पुरुषांचाच सहभाग दिसून येतो आणि स्त्रियांचे स्मशानभूमीत जाणे सामान्यतः वर्ज्य मानले जाते. यामागे नक्की कोणती धार्मिक कारणे आहेत आणि गरुड पुराणात याबाबत काय सांगितलं आहे, जाणून घेऊया.

Why women are not allowed in Shmashan Ghat?
Numerology: कठीण परिस्थितीतही शांत राहतात 'या' तारखेला जन्मलेले लोक; नशिबाचे असतात श्रीमंत, काय आहे यांचे गुपित?

गरुड पुराणात काय सांगितले आहे?

गरुड पुराणात महिलांच्या स्मशानभूमीत न जाण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. स्त्रिया स्वभावाने अधिक संवेदनशील आणि भावुक असतात. स्मशानभूमीत त्यांचे अत्यधिक विलाप करणे किंवा रडणे हे मृताच्या आत्म्यासाठी अडथळा ठरू शकते, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कुटुंबियांच्या अतिमोह आणि रडण्यामुळे आत्म्याचा जगाप्रती मोह वाढतो, ज्यामुळे त्याला पुढील प्रवासासाठी निघणे कठीण होऊ शकते.

दाहसंस्काराच्या वेळी शरीरातून काही विशिष्ट प्रकारचे आवाज निर्माण होण्याची शक्यता असते, जे मनावर विपरित परिणाम करू शकतात. महिलांना अशा विचलित करणाऱ्या दृश्यांपासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा पाळली जाते.

स्मशानभूमी ही अशी जागा मानली जाते जिथे नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती अधिक सक्रिय असतात. महिलांच्या कोमल स्वभावामुळे त्यांच्यावर या शक्तींचा प्रभाव लवकर पडू शकतो, अशीही एक धारणा जुन्या काळापासून चालत आली आहे.

काळाच्या ओघात या परंपरांमध्ये आता बदल होताना दिसत आहेत. आज अनेक ठिकाणी महिला केवळ स्मशानभूमीत जात नाहीत, तर अंत्यसंस्काराच्या विधीमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

गरुड पुराणानुसार महिला अंत्यसंस्कार करू शकतात का?

गरुड पुराणातील 'प्रेत खंड' मधील अध्याय ८ नुसार, जर कुटुंबामध्ये कोणताही पुरुष सदस्य नसेल, तर घराची महिला (पत्नी, मुलगी किंवा बहीण) अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करू शकते. याचाच अर्थ असा की, पुरुष वारसदार नसल्यास महिलांना ही जबाबदारी पार पाडण्याची पूर्ण अनुमती धर्माने दिली आहे. इतकेच नव्हे तर, कुटुंबातील कोणताही नातेवाईक उपलब्ध नसल्यास समाजातील प्रमुख व्यक्ती देखील त्या मृत व्यक्तीवर संस्कार करू शकते.

Why women are not allowed in Shmashan Ghat?
Shani Nakshatra Parivartan 2026: शनीदेव आज बदलणार आपली चाल... साडेसाती सुरू असलेल्या या राशींच्या लोकांना होणार जबरदस्त लाभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news