

Ganesh Chaturthi 2026 Horoscope: येत्या १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळं घरात एक वेगळंच चैतन्य असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार विघनहर्ता गणेश बुद्धी, ऋद्धी अन् सिद्धीचा तसेच शुभ देवता आहे. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याचबरोबर काही ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होऊन शुभ योग देखील प्रभावशील असणार आहे. त्याचा फायदा अनेक राशींना होणार आहे.
गणेश चतुर्थीवेळी बुध आपल्या उच्च राशीत असणार आहे. त्यामुळं कन्या राशीच्या लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मान सन्मान वाढेल, समाजात तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल, स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल.
घर कुटुंबातील वातावरण मंगलमय असणार आहे. मगंलमय कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते. नवीन गाडी किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग देखील आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोणातून एक मोठी पार्टनरशिप होऊ शकते. त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल.
भगवान गणेशाची कृपा होणार असून अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
बुद्धी आणि वाणीचा लाभ मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. त्यांचा स्वामी ग्रह हा बुध देव आहे. हा ग्रह गणपती बाप्पांशी विशेष संबंधित आहे. तुमच्या निर्णय घेणेच्या क्षमतेत सुधारणा होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित संपत्तीबाबत मोठा फायदा होऊ शकतो.
बप्पांच्या कृपेने बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तुमच्या आर्थिक किंवा मानसिक समस्या आता संपुष्टात येतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ वेतनवाढ (पगारवाढ) आणि नवीन संधी घेऊन येणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेशाला २१ दूर्वा आणि मोदक किंवा बेसनच्या लाडवांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. पूजन करताना 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.