Shani Jayanti 2024 : आज शनी जयंती; साडेसातीतून दिलासा देणारे छायादान आणि इतर उपाय कसे करावेत?

Shani Jayanti 2024 : आज शनी जयंती; साडेसातीतून दिलासा देणारे छायादान आणि इतर उपाय कसे करावेत?
Published on
Updated on

[author title="चिराग दारूवाला :" image="http://"][/author]

शनी जयंती आज (गुरुवार, ६ जून) आहे. हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ अमावस्या शनिदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. विशेष करून ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे, शनीची महादशा सुरू आहे, साडेसाती किंवा दहिया आहे, त्यांनी ही पूजा आवर्जून करावी. याशिवाय ज्यांच्या कुंडलीत शनी कमकुवत आहे, त्यांनी न्यायाचा देवता असलेल्या शनिदेवाची पूजा करावी.

हिंदू कँलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला. हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो. या पवित्र दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शुभफल मिळतात. सध्या कुंभ, मकर आणि मीन राशींची साडेसाती सुरू आहे. शनीची साडेसाती सुरू झाल्यानंतर व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले उपाय केले तर शनीच्या साडेसातीपासून काही दिलासा मिळू शकतो.

शनी जयंतीला काय करावे?

ज्योतिषशास्त्रात शनी जयंतीला फार महत्त्व आहे. या दिवशी शनीची पूजा करावी आणि इतर काही गोष्टींची काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला फसवणूक आणि चुकीच्या मार्गांचा त्याग केला पाहिजे. तसेच शनी हा न्यायाचा देवता असल्याने सत्याची पाठराखण करावी. शनीला चुकीची वर्तणूक खपत नाही, हे लक्षात ठेवा. या दिवशी दानधर्म करावे आणि पित्रांचे तर्पण करावे, यामुळे पितृदोषांतून दिलासा मिळेल.

शनिदोषापासून दिलासा मिळण्याचे उपाय

  • हिंदू धर्मात दानधर्माचे महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शनी जयंतीला दानधर्म करावा. या दिवशी उपवास करावा, शनिदेवाचे मंत्र म्हणावेत, आणि शनीशी संबंधित वस्तू दान कराव्यात. उदाहरण म्हणजे काळे चप्पल, काळी छत्री, काळी उडदाची डाळ, काळे तीळ आणि काळे कपडे तुम्ही दान करू शकता.
  • या दिवशी ब्राँझ किंवा लोखंडी पात्रात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात पाहा आणि हे तेल, या पात्रासह गरीब व्यक्तीला दान करावे. किंवा हे पात्र शनी मंदिरात ठेवावे, त्यातून तुमच्या समस्या कमी होतील. या दिवशी शनिदेवाला तेल वाहणे फार शुभ मानले जाते.
  • शनिदेवासोबत हनुमानाचीही पूजा करावी. शनी जयंतीला हनुमान चालिसा, सुंदरकांड यांचे पठण करावे. जी व्यक्ती हनुमानाच्या चरणी येईल आणि हनुमानाची पूजा करेल त्याचे शनीच्या दुष्परिणामांपासून संरक्षण होईल, असे वचन शनीने हनुमानाला दिले आहे.
  • शनी जयंती दिवशी छायादान करणे फार शुभ मानले गेले आहे. यातून तुम्हाला साडेसाती किंवा शनीची दहिया यापासून सुटका मिळू शकते. यासाठी मोहरीचे तेल एका लोखंडी पात्रात घ्या, त्यातील तुमच्या प्रतिमेकडे पाहा आणि त्यानंतर हे पात्र आणि तेल शनी मंदिरात दान करा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news