

Shani Sadesati Rashi
मुंबई: मार्च महिन्यात होळीच्या मुहूर्तावर झालेले वर्षातील मोठे चंद्रग्रहण आणि कुंभ राशीत मंगळ-राहूसह चार ग्रहांची युती, यामुळे खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्ट्या मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत.ज्योतिषशास्त्रानुसार, ३ मार्च रोजी सिंह राशीत झालेल्या चंद्रग्रहणाचे पडसाद शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरू असलेल्या राशींवर उमटण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहणाचा राशींवर होणारा परिणाम किती काळ टिकतो, याबद्दल ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे प्रवाह आहेत. साधारणपणे हा परिणाम १५ दिवसांपासून ते ३ महिन्यांपर्यंत असू शकतो.
सध्या मेष, कुंभ आणि मीन राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे. २०२७ मध्ये जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा कुंभ राशीची साडेसाती पूर्णपणे समाप्त होईल. मात्र, त्यापूर्वी या चंद्रग्रहणामुळे पुढील राशींना सावधानता बाळगावी लागणार आहे. सध्या सिंह आणि धनु राशीवर शनीची ढैय्या सुरू आहे. तर मेष राशीवर साडेसातीचा पहिला, मीन राशीवर दुसरा आणि कुंभ राशीवर साडेसातीचा अंतिम चरण सुरू आहे. या सर्व राशींना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे आगामी काळात सतर्क राहणे हितकारक ठरणार आहे.
मेष राशीच्या व्यक्तींवर या ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल. विशेषतः आर्थिक आघाडीवर येणारे तीन महिने कठीण असू शकतात. मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.व्यवसायात अपेक्षित परतावा मिळण्यास विलंब होईल. भागीदारीच्या कामात समस्या उद्भवू शकतात. कान, नाक आणि घशाशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ राशीच्या व्यक्तींना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. हाडे आणि दातांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे. मोठे वैयक्तिक किंवा व्यावसायिक निर्णय काही काळ लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल.कौटुंबिक वादात सामंजस्याने काम घ्या. लग्नकार्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला.
मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ शारीरिक आणि व्यावसायिक आव्हानांचा असेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. थोडाही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.