

अलिबाग (रायगड) : अतुल गुळवणी
जुलै महिना मध्यावर आला तरी वरुणराजाचा लहरीपणा तसूभरही कमी झालेला नाही. उलट तो दिवंसेदिवस वाढतानाच दिसतोय. निसर्गाच्या या बेभरवशापणाचा फटका समस्त मानवाला बसताना दिसतोय.
भारतासह जगाने विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. अगदी सूर्यालाही गवसणी घालण्याचे सामर्थ्य भारताकडे आले आहे. पण त्यामुळे हजारो वर्षापासून सुरु असलेल्या पंचांगशास्त्राकडेही दुर्लक्ष करुन न चालणारे आहे. कारण अनेकदा पावसाच्या बाबतीत पंचांगशास्त्रांनी व्यक्त केले अनुमान तंतोतंत ठरत आल्याने पंचांगातील नक्षत्रे आणि वरुणराजा यांचं एक अतुट नातं असल्याचे दिसून आले आहे.
हिंदू संस्कृतीत पंचांग शास्त्राला विशेष महत्व आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यावर आधारित असलेल्या पंचांग शास्त्राला विज्ञानयुगातही अनन्यसाधारण असे महत्व आहे. कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना प्रथम पंचांगात जर शुभ दिन असेल तरच त्या कार्याचा प्रारंभ केला जाते.बळीराजाही शेतीची कामे करताना, पेरणी करताना शुभ मुहूर्त बघूनचा कार्यारंभ करत असतो. रोहिणी नक्षत्राचे औचित्य साधत धुळपेरणीही केली जाते.त्यामुळे दरवेळी पंचागांत काय पर्जन्य अंदाज व्यक्त केले जातात याबाबतही उत्सुकता असते. बर्याचदा हवामान खात्याचा अंदाज आणि पंचांगातून व्यक्त केले पर्जन्य अंदाज तंतोतंत खरे ठरल्याचेही दिसून आलेेले आहे.
आद्रा, पुनर्वसु,नक्षत्रात पावसाने बर्यापैकी हजेरी लावलेली आहे.आता पुष्य, आश्लेषा, हस्त या नक्षत्रांचा पाऊस बर्यापैकी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.त्यानुसार 2 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत मोठी पर्जन्यवृष्टी होईल. त्यानंतर 1 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात पावसाचे योग आहेत. मात्र त्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्जन्यमान कमी असेल काही प्रदेशात दुष्काळ सदृश परिस्थिती राहील.असे पंचांगातून सुचित केलेले आहे.
पावसाळी नक्षत्रे ही विशिष्ट वाहनांवर आरुढ होऊन येत असतात.त्यांचा सरासरी कालावधी हा किमान 15 दिवसांचा असतो.या काळात ती नक्षत्रे ल् व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बरसत असतात.सर्वसाधारणपणे मंडूक (बेडूक), म्हैस, मोर, गाढव, हस्त (हत्ती) या वाहनांना त्या त्या नक्षत्रात चांगला पाऊस पडतो असा अंदाज व्यक्त केला जातो. तसे यापूर्वीही अनेकदा दिसून आलेले आहे.
सध्या पुष्य नक्षत्राचा काळ सुरु झालेला आहे. 19 जुलैला मोरावर आरुढ होऊन सूर्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केलेला आहे.या नक्षत्राचा कालावधी हा 2 ऑगस्टपर्यंत आहे.या काळात पडणार्या पावसाला म्हातारा पाऊस असेही संबोधतात.यावेळीही पंचांगकर्त्यार्ंनी म्हातारा पावसाला जोर दाखविला आहे. यानंतर दि 2 ऑगस्टला आश्लेषा नक्षत्र गर्दभावरुन दाखल होत आहे. याकाळातही पावसाचे प्रमाण जोरात राहणार आहे.16 ऑगस्टला मंडूक (बेडूक ) वाहन असलेल्या मघा नक्षत्राचा प्रारंभ होत आहे.तर 30 ऑगस्फटला म्हैशीवर बसून सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात दाखल होत आहे. या काळात जोरात पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.