

Akshaya Tritiya 2026: हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा एक असा दिवस मानला जातो ज्या दिवशी मिळणाऱ्या फळाचा कधी क्षय होत नाही. या वर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी ही १९ एप्रिल रोजी आली आहे. सोमवारी अक्षय तृतीय साजरी केली जाणार आहे.
या दिवशी लोक सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तसेच काही किंमती वस्तू देखील खरेदी करतात. मात्र वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी याबाबत एक वेगळाच दृष्टीकोण समोर ठेवला आहे. प्रेमानंद महाराज सांगतात की या जगातील सर्व वस्तू तर नश्वर आहेत. मात्र या पवित्र दिवशी केलेलं एक विशेष कार्य आपलं लोक आणि परलोक दोन्ही सुधारू शकतं.
सत्संग करतेवेळी प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं की, अक्षय तृतीयेदिवशी आपण जर अन्न, पाणी किंवा धन दान करतोच. मात्र या सर्वांच्या वर नामजप दान आहे. जर तुमच्या तोंडून सतत राधा राधा किंवा प्रभूचे नाम येत असेल आणि हा ध्वनी कोणत्यातरी दुःखी व्यक्तीच्या कानावर पडतो त्यावेळी तो ध्वनी त्याच्या जीवनातील अंधार दूर करतो. नाम जपाचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
१ मौन
प्रेमानंदमहाराजांच्या मते अक्षय तृतीयेला वायफळ चर्चा आणि वादापासून दूर राहून मौन धारण करा. मौन धारण केल्यानं ऊर्जा एकत्रित होते. ही ऊर्जा तुम्ही परमेश्वराच्या भक्तीत वापरू शकता.
२ बाहेरचं पाणी आणि अन्न त्याग
प्रेमानंद महाराज यांनी अक्षय तृतीयेला एक विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या दिवशी बाहेरचं पाणी आणि अन्न ग्रहण करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही तुमच्या घरात परमेश्वराला नेवैद्य करा आणि तोच प्रसाद म्हणून ग्रहण करा, तुमची बुद्धी आणि विचार शुद्ध होतील.
३ नामजप
या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या मंत्राचा नामजप करतात त्याची फलश्रृती कोटीच्या पटीने वाढून मिळते. या दिवशी जेवढं परमेश्वराचे नामस्मरण आणि कीर्तन कराल तेवढे तुमच्या आसपासचे वातावरण सकारात्मक आणि भक्तीमय होते.
अक्षय तृतीयला सोने किंवा चांदी खरेदी करू शकला नाही तर निराश होऊ नसा असं प्रेमानंद महाराज सांगतात. या दिवशी जे काही खरेदी करणार आहात किंवा दान करणार आहात ते सोन्यासारखंच फळ देणार आहे. याच जोडीला मातीच्या घड्यात पाणी भरून कोणाला तरी प्रेमाने ते पाजण्याने देखील अक्षय पुण्य मिळते.