Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, १ डिसेंबर २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 
Updated on: 
चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज व्यावहारिक दृष्टीकोन ठेवल्यास तुमची कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यात मदत होईल. तुमच्या वैयक्तिक हितसंबंधित कामांमध्ये वेळ घालवल्यास आराम मिळेल. कौटुंबिक भेदभावामुळे निराशा वाटण्‍याची शक्‍यता. वाढत्या ताणावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्‍यवहार विचारपूर्वक करा. घरात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही घेतलेला निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतो. गुंतवणुकीशी संबंधित कामे करण्यासाठीही दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. कौटुंबिक व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. घरातील वातावरण आनंदी आणि चांगले राहील. ताप आणि थकवा जाणवण्‍याची शक्‍यता.

मिथुन : आज भावनिक होऊन तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता हे लक्षात ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. तुमचा विरोधक ईर्षेपोटी तुमच्या विरुद्ध अफवा पसरवू शकतो. कोणत्याही परिस्थितीचे शांततेने निराकरण करणे आवश्यक आहे. रागामुळे परिस्‍थिती आणखी बिघडू शकते. कुटुंबात शांतता राहिल. आरोग्‍याच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : आज कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम होईल. एखाद्या सामाजिक संस्थेत योगदान दिल्याबद्दल तुमचा सन्मानही होऊ शकतो. तरुणांनाही काही काळापासून सुरू असलेल्या त्रासातून दिलासा मिळेल. अनावश्यक खर्च वाढल्याने मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या समस्या सोडवण्यात जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य महत्त्वाचे योगदान देतील. यावेळी कोणत्याही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह : आज कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ द्‍याल. तुम्ही मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल तर निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, असे श्रीगणेश सांगतात. मुलांशी वागताना तुमच्या स्वभावात लवचिकता ठेवा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. अधिक कामामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात व्यस्त राहू शकता. अतिकामामुळे जास्त थकवा येऊ शकतो.

कन्या : आज तुम्‍ही मदत केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढेल. स्‍वकीयांशी असलेले वाद मिटल्‍याने नात्‍यात पुन्हा गोडवा येईल. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम आळसामुळे दूर करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक कृतीचा गांभीर्याने विचार करा. आनंदी कौटुंबिक वातावरण राखणे खूप महत्वाचे आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. हवामान बदलामुळे थकवा जाणवेल.

तूळ : आज ज्‍येष्‍ठांच्‍या मार्गदर्शनामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल काही महत्त्वाचे धडे देखील शिकू शकता. अति राग एखादे काम खराब करू शकतो. संयमाने काम करणे गरजेचे आहे. आज व्यवसायात जास्त त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे वाहन वापरताना काळजी घ्या.

वृश्चिक : आज काही लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेवून तुमची दिशाभूल करू शकतात. आज भावनेच्‍या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका. प्रत्येक काम प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. यावेळी जास्त मेहनत आणि कमी नफा अशी परिस्थिती असेल. तणाव घेणे हा या समस्येवर उपाय नाही. योग्य वेळेची वाट पाहा. परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. घरगुती समस्यांमुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. शारीरिक दुखापतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

धनु : श्रीगणेश सांगतात की, आज एखाद्या राजकीय किंवा सामाजिक कार्याशी संबंधित महत्त्वाच्या संभाषणात किंवा बैठकीला जाण्याची संधी मिळू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण यामुळे महत्त्वपूर्ण यश मिळू शकते. तरुणांनी अनैतिक कामात गुंतलेल्या लोकांपासून लांब राहावे. अन्‍यथा तुमची बदनामी होण्‍याचा धोका आहे. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. आज व्यावसायिक कामे थोडी मंद असू शकतात. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमची दिनचर्या आणि खाणे व्यवस्थित ठेवा.

मकर : आज तुम्ही तुमच्या कुशल व्यवहारातून घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखाल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आनंददायी वातावरण निर्माण होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. निसर्गाच्या सानिध्‍यात थोडा वेळ घालवा. राग आणि हट्टी स्वभाव याा दोषांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य या कमतरतांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. यावेळी तुमच्या सध्याच्या व्यवसायाकडे लक्ष द्या. भरपूर काम असूनही, घर आणि कुटुंबासाठी तुमचे समर्पण घरात आनंदी वातावरण टिकवून ठेवेल. डोकेदुखीच्या समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

कुंभ : आर्थिक योजनेवर काम करण्यासाठी अतिशय सोयीची वेळ असल्याचे श्रीगणेश सांगतात. यावेळी ग्रहस्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर वातावरण निर्माण करत आहे. घरातील कोणत्याही चांगल्या कामाची योजना यशस्वी होईल. मौजमजेत वेळ घालवण्याऐवजी आपल्या कृतींकडे गांभीर्याने लक्ष द्या. अन्यथा तुमची अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहण्‍याचा धोका. मुलांच्या समस्यांबद्दल तुम्हाला काही चिंता असू शकते. आरोग्य उत्तम राहिल.

मीन : आज अचानक एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. एकमेकांच्या भेटीगाठी आणि संवाद यातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी होऊ शकतात. आर्थिक स्थिती समाधानकारक राहू शकते, असे श्रीगणेश सांगतात. गुंतवणूक करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक सदस्याच्या आरोग्याबाबतही चिंता असू शकते. वैवाहिक जीवन आनंद अनुभवाल. चुकीच्या आहारामुळे काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news